डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, थेट या देशाने दिले आव्हान, अणुशस्त्रांविषयी एक…

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धात मोठा दणका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नव्हता असे युद्ध इराणकडून लढले जात आहे. यादरम्यानच आता अत्यंत मोठी धमकी अमेरिकेला देण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, थेट या देशाने दिले आव्हान, अणुशस्त्रांविषयी एक...
Donald Trump
| Updated on: Mar 24, 2026 | 9:03 AM

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आला. या हल्ल्यात इराणला दणका बसला. इराणचे सर्वाेच्च नेते या हल्ल्यात ठार झाले. मात्र, आता इराण युद्धात पुढे असून त्यांनी इस्त्रालय, अमेरिका आणि आखाती देशांना सळो की पळो करून सोडले. इराण युद्धात कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेत नाही. हेच नाही तर युद्ध थांबवायचे असेल तर काही अटही इराणकडून ठेवण्यात आला. या युद्धात एकही देश युद्धात पुढे येत नसल्याने मोठी नाचक्की अमेरिकेची झाली. यादरम्यानच आता अमेरिकेच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी संसदेला संबोधित करताना सुरक्षा आणि आर्थिक धोरणांवर भर देत देशाचे अणुधोरण अधिक मजबूत केले असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या नावाचा उल्लेख करत मोठे चॅलेंजही दिले.

किम जोंग उन यांनी म्हटले की, अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला थेट आव्हान देत आहे, त्यांच्या देशाचे अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून असलेले स्थान कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय आहे. परमाणू शक्तींची ताकद अधिक वाढवणार आहेत. दक्षिण कोरिया हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

किम जोंग उन यांनी मोठा निर्णय घेतला. किम यांनी 2026 च्या त्यांच्या अर्थसंकल्पात संरक्षण खर्चात 15.8 टक्क्यांनी वाढ केली. किम जोंग यांनी अमेरिकेचे नाव घेत थेट धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असतानाच ही धमकी थेटपणे अमेरिकेला किम जोंग यांनी दिली. यासोबतच या युद्धात किम जोंगने अगोदरच अमेरिकेला स्पष्ट शब्दात मोठा इशारा दिला होता.

या युद्धादरम्यान उत्तर कोरियाचा एकही नागरिक ठार झाला तर याला डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका जबाबदार असेल त्यानंतर काय होईल, याचा विचारही कोणी करू शकणार नाही. म्हणत मोठी धमकी किम जोंग उनने दिली होती. सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या निर्णयामुळे अमेरिका संकटात असल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us