Jensen Huang Divorce : जेन्सेन हुआंग यांना बेवफाई महागात पडणार, बायकोला द्यावी लागेल तब्बल 7 लाख कोटींची पोटगी; ठरणार सर्वात महागडा घटस्फोट!

फोर्ब्सच्या 9 नोव्हेंबर 2026 च्या आकडेवारीनुसार, जेन्सेन यांची एकूण संपत्ती 155.2 अब्ज डॉलर आहे. त्यांचे आणि लोरी यांचे लग्न 1980 च्या दशकात झाले, तर एनव्हिडियाची स्थापना 1993 मध्ये झाली.

Jensen Huang Divorce : जेन्सेन हुआंग यांना बेवफाई महागात पडणार, बायकोला द्यावी लागेल तब्बल 7 लाख कोटींची पोटगी; ठरणार सर्वात महागडा घटस्फोट!
jensen huang and lori huang divorce
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 10:10 PM

CEO of Nvidia is Jensen Huang : जगातील आघाडीची चिपनिर्मिती कंपनी एनव्हिडियाचे (NVIDIA) सीईओ जेन्सेन हुआंग सध्या एका कथित वैयक्तिक वादामुळे चर्चेत आले आहेत. जेन्सेन हे सिंगापूरमधील एलिस हुआंग या महिलेसोबत नात्यात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खुद्द त्यांनीच याबाबतचा खुलासा केलाय. या प्रकरणात एलिस हुआंग या महिलेवर चिनी गुप्तहेर असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. याबाबत स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर एलिस हुआंग याच्यासोबत त्यांची पत्नी लोरी हुआंग यांनी घटस्फोट घेतला तर त्यांना किती पोटगी मिळणार? असं विचारलं जातंय. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं तर लोरी यांना आतापर्यंतची सर्वात मोठी पोटगी मिळू शकते.

लोरी हुआंग यांना किती रुपये मिळणार?

जेन्सेन हुआंग यांचे प्रकरण समोर आल्यानंतर लोरी हुआंग त्यांना घटस्फोट मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोरी यांनी अद्याप घटस्फोटाबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. मात्र, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यास हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो, अशी चर्चा आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना तब्बल 75 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 7 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

ठरू शकतो सर्वात महागडा घटस्फोट

याआधी मुळे बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांचा घटस्फोट सर्वात महागडा होता, असे बोलले जाते. या महागड्या घटस्फोटात जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचेही नाव घेतले जाते. परंतु जेन्सेन हुआंग आणि लोरी हुआग यांच्यात घटस्फोट झाला तर ते महागड्या पोटगीचे सर्व विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. 2021 साली बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्यात सुमारे 76 अब्ज डॉलरच्या संपत्तीचे विभाजन झाले होते. तर 2019 साली जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचा घटस्फोट सुमारे 38.3 अब्ज डॉलरमध्ये झाला होता.

पोटगीचं गणित समजून घ्या

फोर्ब्सच्या 9 नोव्हेंबर 2026 च्या आकडेवारीनुसार, जेन्सेन यांची एकूण संपत्ती 155.2 अब्ज डॉलर आहे. त्यांचे आणि लोरी यांचे लग्न 1980 च्या दशकात झाले, तर एनव्हिडियाची स्थापना 1993 मध्ये झाली. कॅलिफोर्नियाच्या कम्युनिटी प्रॉपर्टी कायद्यानुसार, लग्नादरम्यान कमावलेल्या संपत्तीवर पती-पत्नीचा समान हक्क असू शकतो. त्यामुळे घटस्फोट झाल्यास संपत्तीच्या विभाजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्षात किती रक्कम मिळेल, हे कायदेशीर प्रक्रिया आणि मालमत्तेच्या स्वरूपावर अवलंबून असेल. त्यामुळे नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us