भर समुद्रात तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला, भारतीय नाविक बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून संताप!l

जगभरातील व्यापारी जहाजांवर मोठ्या संख्येने भारतीय नाविक कार्यरत आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा भारतीय नाविकांच्या सुरक्षेवरही परिणाम होत आहे. अलीकडेच ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या नाविकांच्या सुरक्षेसाठी ‘मॅरिनर्स इमर्जन्सी असिस्टन्स नेटवर्क’ उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता.

भर समुद्रात तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला, भारतीय नाविक बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून संताप!l
oil tanker attack
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 7:45 PM

सध्या मध्यपूर्वेत मोठा तणाव पाहायला मिळतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करण्याची भाषा बोलून दावखत असतात. दरम्यान, एकीकडे या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत असतानाच ओमानच्या किनाऱ्याजवळ पनामाचा ध्वज असलेल्या MT El Gaia या तेलवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले असून एक भारतीय नाविक बेपत्ता आहे. या नाविकाच शोध सुरू आहे. या जहाजावर एकूण 14 भारतीय क्रू सदस्य होते. त्यापैकी 13 भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या बचाव मोहिमेत भारताला ओमानच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले. या सहकार्यासाठी भारताने ओमानचे आभार मानले आहेत.

भारताने मानले ओमानचे आभार

ही घटना घडताच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओमानमधील भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच बेपत्ता भारतीय नागरिकाचा शोध घेण्यासाठी ओमानच्या प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे. भारतीय नाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केल्याबद्दल भारताने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन केले आहे. संघर्षाचे प्रश्न संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडवण्याची गरज आहे. जहाजे, नाविक, नागरिक आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे स्वीकारार्ह नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

काय तोडगा काढला जाणार?

जगभरातील व्यापारी जहाजांवर मोठ्या संख्येने भारतीय नाविक कार्यरत आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा भारतीय नाविकांच्या सुरक्षेवरही परिणाम होत आहे. अलीकडेच ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या नाविकांच्या सुरक्षेसाठी ‘मॅरिनर्स इमर्जन्सी असिस्टन्स नेटवर्क’ उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. असे असताना भारतीय नाविक बेपत्ता झालाय. त्यामुळे हा नाविक सापडणार का? भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी काय तोडगा काढला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us