Tukaram Mundhe FDA : शाहरुख, अजय देवगण तुकाराम मुंढेच्या कचाट्यात सापडले, ‘त्या’ याचिकेवर कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय
अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र FDAने खूप पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आता कंपनीला मोठा धक्का दिला आहे.

विमल पान मसाल्याशी संबंधित प्रकरणात कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र एफडीएविरोधात दाखल करण्यात आलेली कंपनीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली. हे प्रकरण आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं असून कंपनीला मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित मागणी करण्यात आली होती. कंपनीने दाखल केलेल्या याचिकेत विमल पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात या तिन्ही अभिनेत्यांना देण्यात आलेली याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती स्वर्ण कांता ही याचिका फेटाळून लावत संबंधित प्रकरणासाठी मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ही याचिका विमल इलायचीचे उत्पादन करणाऱ्या ‘पीबी ॲग्रो एलएलपी’ या कंपनीने दाखल केली होती.
काय आहे सर्व प्रकरण?
महाराष्ट्र एफडीएने विमल इलायचीच्या जाहिरातीवर आक्षेप घेत, ही जाहिरात राज्यात बंदी असलेल्या विमल पान मसाला या उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा आरोप केला होता. यानंतर एफडीएने तिन्ही कलाकारांना विमल इलायची हे उत्पादन प्रतिबंधित पान मसाल्यापेक्षा वेगळे असल्याचे स्पष्ट करणारे दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच ही जाहिरात मोहीम थांबवण्याचे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून या संदर्भातील साहित्य हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
कंपनीने घेतलेला आक्षेप
या कारवाईविरोधात कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, 11 ऑगस्ट 2026 रोजी एफडीएने पाठवलेली नोटीस थेट कलाकारांना दिली गेली असून कंपनीला यात कोणतीही पूर्वसूचना किंवा संधी देण्यात आली नाही. या कारवाईमुळे कंपनीचे मोठे नुकसान होणार आहे कंपनीने याचिकेत असा दावा केला आहे की, विमल पान मसाला 2001 पासून महाराष्ट्रात तयार केला जात नाही किंवा विकला जात नाही. तसेच तंबाखूयुक्त पान मसाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने 2013 पासून देशभरात बंदी घातली आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या कोणत्याही जाहिरातीचा आरोप पूर्णपणे निराधार आहे.
दरम्यान, आता एफडीएच्या रडारवर असलेल्या जाहिरात करणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांबाबत आणि कंपनीबाबत मुंबई हायकोर्टात काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
