AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच… वकिल काय म्हणाले?

| Updated on: Sep 14, 2026 | 5:44 PM
Share

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एफआयआर दाखल केला आहे. गँगरेप, हत्या आणि कट रचल्याच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली असून, दिशाच्या वडिलांच्या जबाबावरून एफआयआर नोंदवण्यात आला. आदित्य ठाकरे, डीनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांचाही आरोपींच्या यादीत समावेश आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये गँगरेप, हत्या आणि कट रचल्याचा उल्लेख आहे. दिशाच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१, २१७, २१८ आणि १२० बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या यादीत आदित्य ठाकरे, डीनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, परम बीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. तसेच, डीसीपी विशाल ठाकूर, एसआयटीचे अधिकारी, मालवणी पोलीस ठाण्यातील पीआय चिमाजी आढाव, पीआय शैलेंद्र नगरकर, एपीआय अशोक देवडे या पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

याशिवाय, खोटा पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट तयार केल्याचा आरोप असलेले डॉ. संजय जाधव आणि फॉरेन्सिक लॅबमधील केमिकल ॲनालायझर भाले यांच्या नावांचाही उल्लेख आहे. या प्रकरणात, दिशा सालियानकडे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या गुन्हेगारी कृत्यांचे (ड्रग्स व्यवहार, बाल शोषण, बाल तस्करी) व्हिडिओ रेकॉर्डिंग होते असा आरोप एफआयआरमध्ये नमूद आहे. तिने हे पुरावे सुशांत सिंग राजपूतला दिले होते. सुशांत ही माहिती पत्रकार परिषदेत उघड करणार असल्याने, रिया चक्रवर्तीच्या मदतीने त्याचा कट रचून दिशाचा खून करण्यात आला आणि नंतर सुशांत सिंग राजपूतसह सर्व साक्षीदारांना संपवण्यात आल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Published on: Sep 14, 2026 05:44 PM

Follow Us