AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही मला सांगणारे कोण? बाप्पाच्या आरतीमुळे राजघराण्यात वाद, सांगलीमध्ये काय घडलं? राज्यात चर्चा

सांगलीचे आराध्य दैवत गणपती बाप्पा असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून आता सांगलीचे राजे पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता आहे.

तुम्ही मला सांगणारे कोण?  बाप्पाच्या आरतीमुळे राजघराण्यात वाद, सांगलीमध्ये काय घडलं? राज्यात चर्चा
सांगलीच्या राजघराण्यात वाद Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 7:38 PM
Share

सांगलीचे आराध्य दैवत गणपती बाप्पा असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून आता सांगलीचे राजे पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता आहे. आज सकाळी गणपती मंदिरात अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलत गणपती मंदिरात आरती केल्याने वादाला सुरुवात झाली आहे. यावेळी मी वारसदार असल्याचा दावा करत अभिनेत्री भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन उत्सव मूर्तीची आरती केली. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी कोण यावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाग्यश्री पटवर्धन यांनी सकाळीच सांगलीचं मुख्य गणपती मंदिर गाठत मंदिराच्या गाभाऱ्यात ठिय्या मारला. यावेळी प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्सव मूर्ती दरबार हॉलकडे जाण्यासाठी आरती करण्यात येणार होती. यासाठी नूतन युवराज आदित्य राजे पटवर्धन यांना बोलवण्यात आले, मात्र त्यांना थांबवत  भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. या प्रकारामुळे सर्वजण अचंबित झाले. तसेच राजेंची तब्यत बरी नसते त्यामुळे आम्ही मुली पैकी कोणी तरी यावे आणि आरती करावी असंही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान तुम्ही मला सांगणारे कोण असा सवालही सवाल यावेळी भाग्यश्री यांनी केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे राजेसाहेब विजयसिंह पटवर्धन चांगलेच संतप्त झाले. मी राजा या नात्याने आदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे आदित्य राजेच संस्थांनाचे पुढचे राजे असणार आहेत. युवराजांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती करने आणि लोकांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसने योग्य नसल्याचे राजे विजयसिह पटवर्धन यांनी स्पष्ट केले. त्यांना असे करण्याचा अधिकार नसल्याचे विजयसिंह राजे पटवर्धन यांनी स्पष्टीकरण दिले आहॆ. त्यामुळे भाग्यश्री आणि पती हिमालय यांच्याशी संस्थानांच्या मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार न करण्याचे आवाहन राजे साहेबांनी केले आहॆ. आणि आदित्य राजे पटवर्धन हेच संस्थांनाचे उत्तराधिकारी असतील आणि सांगलीकर जनतेने त्यांना साथ द्यावी असे आवाहन देखील यावेळी विजयसिंह पटवर्धन यांनी केलं आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती