AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा तर महाराष्ट्राचा अपमान, अमित शाह यांच्या मराठीच्या विधानावरुन मनसे झाली आक्रमक

संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहासाचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही अमित शाहना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

हा तर महाराष्ट्राचा अपमान, अमित शाह यांच्या मराठीच्या विधानावरुन मनसे झाली आक्रमक
amit shah
| Updated on: Sep 14, 2026 | 8:10 PM
Share

महाराष्ट्र हे देशातील बहुभाषिक राज्य आहे. येथे अनेक भाषा नांदत आहेत. मात्र, काही लोक दुसरी भाषा शिकण्यास नकार देत आहेत असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमात केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचेही ते म्हणाले. त्यावर मनसेने संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी मराठीचा अपमान करु नये, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. हवे तर अमित शाह यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहासाचे पुस्तक आम्ही अमित शाह यांना पाठवू असा इशारा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे. महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं ते म्हणत आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह यांनी हिंदी भाषा संमेलनात येऊन करु नये असा इशारा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की एका बाजूला ते म्हणतात गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन त्यांनी शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल. हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशात किंवा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का? असा सवाल देखील गजानन काळे यांनी दिला आहे.

अण्णा मलाई यांनी मध्यंतरी उदाहरण दिलं होतं की,  हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये एका खासदाराच्यावर यश मिळालं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहासाचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती