AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हत्ती, घोडे, कोंबड्या आणणार नाही, नियम मोडल्यास थेट…मनोज जरांगेंचा आंदोलनासाठी नवा अर्ज; काय काय मान्य केलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारली आहे. दरम्यान त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे.

हत्ती, घोडे, कोंबड्या आणणार नाही, नियम मोडल्यास थेट...मनोज जरांगेंचा आंदोलनासाठी नवा अर्ज; काय काय मान्य केलं?
manoj jarange patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 8:55 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईमध्ये येऊन उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी दोनदा त्यांना या उपोषणासाठी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांनदा परवानगीसाठी अर्ज केला आहे. जी कारणं सांगून पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाची परवानगी नाकारली होती,  त्या सर्व अटींचं पालन करण्यास आपण तयार असल्याचं या अर्जामध्ये जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अर्जामध्ये जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? 

मराठा समाजाच्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथे शांततेच्या मार्गाने जाहीर उपोषण करण्यात येणार आहे. सदर आंदोलन संपूर्णत: शांततेच्या मार्गाने, लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येणार असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण दक्षता घेतली जाईल असं या अर्जामध्ये म्हटलं आहे. या अर्जामध्ये एकूण 20 अटी मान्य करण्यात आल्या आहेत.

ज्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर त्यास दाखवण्यासाठी दिलेल्या पवानगीची मूळ प्रत सोबत बाळगली जाईल. अर्जामध्ये नमूद जेवढी आंदोलकांची संख्या आहे, ती तेवढीच मर्यादीत राहील याची काळजी घेतली जाईल. तसेच या आंदोलनामध्ये सहभागी झालेला कोणताही व्यक्ती चिथावणीखोर भाषणं, अथवा जमावाची भावना भडकवणारी भाषणं करणार नाही. तसेच आम्ही खात्रीने सांगतो, की ट्रॅक्टर, ढकलगाडी (ट्रॉली), बैलगाडी, सायकल रिक्षा, हातगाडी, यांसह कोणंतीही वाहने किंवा पक्षी, घोडे, हत्ती, उंट, कोंबड्या इत्यादींसारखे प्राणी धरणे, निरदर्शने सुरू असलेल्या ठिकाणी आणली जाणार नाहीत, असंही मनोज जरांगे पाटील यांना आपल्या अर्जामध्ये म्हटलं आहे. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा