भारत मोठ्या संकटात, 8 देशांनी एकत्र येत घेतला हादरवून टाकणारा निर्णय!

अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. असे असताना ओपेक प्ल्स गटाने घेतलेल्या निर्णयामुळे भारत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

भारत मोठ्या संकटात, 8 देशांनी एकत्र येत घेतला हादरवून टाकणारा निर्णय!
india and oil demand
| Updated on: Nov 03, 2025 | 4:57 PM

India Petrol And Diesel Price : रशिया आणि युक्रेन यांच्यातील व्यापारविषयक संबंध बरेच जुने आहेत. इतर देशांच्या तुलनेत रशिया भारताला कमी दरात तेल विकतो. म्हणूनच भारत प्रामुख्याने या देशाकडूनच तेलाची खरेद करतो. मत्र अमेरिकेने प्रतिबंध घातल्यानंतर भारताने रशियाच्या दोन तेल निर्मिती कंपन्यांकडू तेल खरेदी करणे तात्पुरते थांबवले आहे. आता भारत अन्य तेल विक्रेता देशांच्या शोधात आहे. असे असतानाच आता OPEC+ देशांनी भारताची चिंता वाढवणारे एकूण दोन निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

OPEC+ देशांनी नेमके काय निर्णय घेतले आहेत?

न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार ओपेक प्लस देशांची रविवारी (3 नोव्हेंबर) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. यातील पहिला निर्णय हा डिसेंबर 2025 पासून रोज 1.37 लाख बॅरेलने तेल उत्पादनात वाढ करण्यात येईल. जागतिक पातळीवरील मागणी लक्षात घेता तेल उत्पादनात केलेली ही वाढ किरकोळ समजली जात आहे. दुसऱ्या निर्णयाअंतर्गत 2026 सालाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तेल निर्मिती वाढवणे पूर्णपणे थांबवण्यात येईल. म्हणजेच या काळात तेल उत्पादनात कोणतीही वाढ होणार नाही. या काळात बाजारावर बारीक लक्ष ठेवले जाईल.

भारताला काय फटका बसणार?

ओपेक प्लस गटात एकूण 22 प्रमुख तेल निर्मिती करणाऱ्या देशांचा समावेश होतो. या गटाने घेतलेल्या निर्णयाचा जागतिक तेल उत्पादन तसेच तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम पडतो. ओपेक प्लस गटाच्या निर्णयानुसार तेल उत्पादन सीमित असेल तर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाची किंमत वाढू शकते. भारत आपल्या आवश्यकतेच्या तुलनेत 85 टक्के तेलाची आयात करतो. ओपेक प्लस गटाच्या या निर्णयामुळे भारताचा खर्च वाढू शकतो. यामुळे राजकोषीय तूट आणि महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच डॉलरच्या मागणी वाढल्याने रुपयावरील दबावही वाढू शकतो.

भारतात पेट्रोल, डिझेल महाग होणार का?

दरम्यान, अमेरिकेने रशियाच्या दोन तेलनिर्मिती कंपन्यांवर निर्बंध घातल्यानंतर भारत सौदी अरेबिया, इराक, यूएई यासाख्या देशांकडे कच्चे तेल मागवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु या देशांच्या कच्च्या तेलाची किंमत रशियाच्या तुलनेत अधिक आहे. असे असताना ओपेक प्ल्स गटाने तेल निर्मितीत वाढ न केल्यास आणि रशियाकडून मिळणाऱ्या तेलात घट झाल्यास आगामी काळात भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर परिणाम पडू शकतो. त्यामुळे आता भारताची चिंता वाढली असून भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.