Fatah-3 Missile : पाकिस्तानकडून सुपरसॉनिक फतह-3 क्रूज मिसाइलची यशस्वी चाचणी, भारताकडे हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी उत्तर तयार

Fatah-3 Missile : पाकिस्तानने आज फतह-3 या सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे पाकिस्तानची ताकद वाढणार आहे. भारतासाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. आर्मी रॉकेट फोर्स कमांडचे कमांडर, वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक आणि इंजिनिअर यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली.

Fatah-3 Missile : पाकिस्तानकडून सुपरसॉनिक फतह-3 क्रूज मिसाइलची यशस्वी चाचणी, भारताकडे हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी उत्तर तयार
Fatah-3 Missile
Image Credit source: wikipedia
| Updated on: Nov 18, 2026 | 8:14 PM

पाकिस्तानी सैन्याने आज फतह-3 या सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यामुळे पाकिस्तानची सैन्य क्षमता अधिक बळकट होणार आहे. या चाचणीत पाकिस्तानने आधुनिक नेविगेशन आणि प्रोपल्शन सिस्टिमचा समावेश केला होता. फतह-3 च्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानला अचूक आणि लांब पल्ल्यापर्यंत अचूक लक्ष्यभेद करता येणार आहे. पाकिस्तानच्या आर्मी रॉकेट फोर्स कमांडचे कमांडर, वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक आणि इंजिनिअर या चाचणीच्यावेळी उपस्थित होते. फतह-3 एक सुपरसॉनिक क्रूज मिसाइल आहे. आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेग त्याला सुपरसॉनिक मिसाइल म्हणतात. क्रूज मिसाइल समुद्र आणि जमीन या दोन्ही ठिकाणाहून डागता येऊ शकतं. फतह-3 मिसाइलचं वैशिष्ट्य म्हणजे हे मिसाइल स्वत:चं उड्डाण नियंत्रित करुन लक्ष्यापर्यंत पोहोचतं. आधुनिक नेविगेशन सिस्टिममुळे या मिसाइलची अचूकता अधिक वाढल्याचं पाकिस्तानी सैन्यानकडून सांगण्यात आलं.

ही चाचणी रॉकेट फोर्सची क्षमता वाढवणारी आहे. पाकिस्तानकडून सैन्याच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. ही चाचणी त्याचाच एक भाग आहे. अशा प्रकारच्या परीक्षणामुळे सैन्याला जास्त पर्याय मिळतात. पाकिस्तानची फतह-3 ची चाचणी यशस्वी होणं ही भारतासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. पण भारताकडे याला उत्तर तयार आहे. फतह-3 हवेतच नष्ट करण्यासाठी भारताकडे S-400 ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानचं फतह क्रूज मिसाइल पाडलं होतं.

Loading...

इराणने अख्ख्या जगाला दाखवून दिली मिसाइल शक्ती

लांब पल्ला आणि अचूकतेमुळे युद्ध काळात पाकिस्ताला एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. पाकिस्तान सरकार आणि सैन्य नेतृत्वाने हे वैज्ञानिक आणि इंजिनियर्सच यश असल्याचं सांगितलं. मिसाइलची ताकद काय असते हे इराणने अख्ख्या जगाला दाखवून दिलं आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यावेळी इराणकडे त्यांचा मुकाबला करण्यासाठी फक्त मिसाइल्सची शक्ती होती. त्या बळावर इराणने अमेरिका, इस्रायलचे इरादे हाणून पाडले. फक्त मिसाइल शक्तीमुळेच अमेरिका-इस्रायल इराणला झुकवण्यात अयशस्वी ठरले.

पाकिस्तानची ताकद वाढणार

पाकिस्तान मागच्या काही वर्षांपासून सातत्याने मिसाइल कार्यक्रम विकसित करत आहे. फतह सीरीजची मिसाइल याच कार्यक्रमाचा भाग आहे. यशस्वी चाचणीमुळे वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढतो. सैन्याला सुद्धा पर्याय मिळतो. पुढच्या काही काळात पाकिस्तानकडून अजून काही मिसाइल चाचण्या होऊ शकतात. फतह-3 च्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानची ताकद वाढणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us