पाकिस्तानकडून हाफीज सईदच्या दोन संघटनांवर बंदी

इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पाऊलांनी पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. यामुळेच गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदच्या या दोन्ही संघटना आहेत. काही दिवसांपूर्वीच या संघटनांवरील बंदी हटवण्यात आली होती. …

पाकिस्तानकडून हाफीज सईदच्या दोन संघटनांवर बंदी

इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पाऊलांनी पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. यामुळेच गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदच्या या दोन्ही संघटना आहेत. काही दिवसांपूर्वीच या संघटनांवरील बंदी हटवण्यात आली होती. या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून जवळपास 300 धार्मिक शिक्षण संस्था आणि शाळा, रुग्णालये, प्रकाशने आणि रुग्णवाहिका सेवा दिली जाते. शिवाय संघटनेचे जवळपास 50 हजार स्वयंसेवक आहेत.

हाफीज सईद हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. याच संघटनेने मुंबईतील हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव घेतला होता. 2012 मध्ये लष्कर ए तोयबावर बंदी घालण्यात आली. यानंतर हाफीज सईदने दहशतवादी कारवाया चालू ठेवण्यासाठी जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनची स्थापना केली. अमेरिका आणि युरोपियन देशांच्या फायनन्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफटीएफ) दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे.

एफटीएफच्या या कारवाईनंतर तत्कालीन पाकिस्तान सरकारने जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनवर बंदी घातली. यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी दहशतवाद विरोधी अधिनियम 1997 मध्ये संशोधन करण्यासाठी अध्यादेश जारी केला. पण या अध्यादेशाचा कालावधी संपला होता. त्यामुळेच दोन्ही संघटनांवर घातलेली बंदी पुन्हा हटली गेली.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *