AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही – राहुल गांधींना कोणी सुनावलं ?

निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण मोदी जींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं असं भाजप नेत्याने राहुल गांधींना सुनावलं.

मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही - राहुल गांधींना कोणी सुनावलं ?
rahul gandhi
| Updated on: Apr 26, 2024 | 11:27 AM
Share

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून राजकीय प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही जोरात सुरू आहे. सोलापुरमधील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं एक वक्तव्य भाजप नेत्यांना चांगलंच झोंबलं असून त्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सोलापूरमधूील सभेत राहुल गांधी यांच्याकडून कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी मोदींवर कडाडून हल्ला चढवत टीकाही केली होती. मात्र त्यांचं वक्तव्य भाजप नेत्यांना रुचलं नसून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. औकातीत रहा असंही बावनकुळे यांनी राहल यांना सुनावलं. ‘ निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं’ असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांचं ट्विट त्यांच्या शब्दात जसंच्या तसं..

सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला.

निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही. अशा शब्दात बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.