AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलत बहिणीशी लग्न करताच… पाकिस्तानात धक्कादायक असं काय घडतंय? शास्त्रज्ञही हैराण

पाकिस्तानात चुलत लग्न ६१.२% असून, यामुळे संततीत गंभीर जनुकीय विकार आणि 'ह्यूमन नॉकआउट' सारख्या समस्या वाढत आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार, रक्ताच्या नात्यातील लग्नामुळे मुलांमध्ये अनुवांशिक आजार होण्याची शक्यता वाढते. ३४ हजार लोक 'ह्यूमन नॉकआउट'ने ग्रस्त आहेत.

चुलत बहिणीशी लग्न करताच... पाकिस्तानात धक्कादायक असं काय घडतंय? शास्त्रज्ञही हैराण
Muslim Wedding (Representative image)Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2026 | 7:16 PM
Share

Cousin Marriage in Pakistan : जगभरात कजिन मॅरेज म्हणजे चुलत भाऊ, मामेभाऊ, मावसभावाशी लग्न करण्यात पाकिस्तान टॉपवर आहे. रक्ताच्या नात्यातच लग्न करण्याच्या प्रकारावर अमेरिकेच्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू या संस्थेने एक सर्व्हे केला होता. 2023च्या या आकडेवारीनुसार पाकिस्तानात रक्ताच्या नात्यासोबत निकाह करण्याचा पाकिस्तानाचा रेट 61.2 टक्के आहे. या सर्व्हेनुसार, काही धक्कादायक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. या सर्व्हेनुसार रक्तातच लग्न करणं येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या मतानुसार, या लग्नांमुळे होणाऱ्या संततीत जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे गंभीर अनुवांशिक विकार आणि अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता अनेकपटीने वाढतो.

पाकिस्तानात सुमारे 34 हजार लोक ह्यूमन नॉकआऊट झाले आहेत. म्हणजे या लोकांच्या कमीत कमी एका जीनने काम करणं बंद केलं आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे, असं या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानात चुलत बहीण, मावस बहिणीशी लग्न करताच हे प्रकार घडत असल्याने पाकिस्तानी नागरिक टेन्शनमध्ये आले आहेत.

ह्यूमन नॉकआऊट काय आहे?

विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर शरीरातील खास जीन पूर्णपणे निष्क्रिय होते किंवा गायब होते. त्याला ह्युमन नॉकआऊट म्हटलं जातं. सामान्यपणे मानवी शरीरातील प्रत्येक जीनच्या दोन कॉप्या ( एक आई आणि दुसरी वडिलांची) असतात. रक्तसंबंधात लग्न झाल्याने मुलांना आईवडिलांपासून एक सारखं म्युट्यूशन मिळतं. त्यामुळे त्यांच्या शरीरातील एखादं खास जीन पूर्णपणे गायब होतं. 17 जून रोजी नेचरमध्ये एक सर्व्हे छापून आला होता. हा निष्कर्ष सर्वात मोठ्या दक्षिण आशियाई जीनोमिक अभ्यासापैकी एकाचा भाग आहे. त्यात देशातील 1,73,303 जीनोमचं आकलन करण्यात आलं होतं. या शोधाचा हेतू मानव आनुवांशिकीच्या विकासाला समजून घेणे आणि त्याच्याशी संबंधित आवश्यक औषधांची निर्मिती करणे होतं.

स्टडीत काय मिळालं?

कोलंबिया यूनिव्हर्सिटी वॅगेलोस कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्समधील मेडिकल सायन्सचे प्रोफेसर दानिश सालेहिन यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. जीनोम स्टडीजमध्ये दक्षिण आशियाई लोकांची भागिदारी फार कमी आहे. जगातील लोकसंख्येचा 25 टक्के भाग असूनही ग्लोबल जीनोमिक डेटाबेसमध्ये त्यांची भागिदारी फक्त दोन टक्के आहे. पण दक्षिण आशियाई जीनोमची खास विशेषत: ही लोकसंख्येचा इतिहास आणि सांस्कृतिक रिजी रिवाजांनी बनलेली आहे. जगभरातील मेडिकल क्षेत्रात अशी मोठ्या यशाचा आधार बनू शकतो, त्यामुळे रुग्णांना फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?