AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Strait Of Hormuz : हॉर्मुज जवळच्या समुद्रात चीन-पाकिस्तानची खतरनाक चाल, भारताची कोंडी करण्यासाठी टाकला नवीन डाव

Strait Of Hormuz : स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची सगळ्या जगात चर्चा आहे. इराणसाठी हा जलमार्ग हुकूमी एक्का बनला आहे. आता या हॉर्मुज जवळच्या समुद्रात चीन-पाकिस्तानने एक नवीन खेळ सुरु केला आहे. यामागे भारताची कोंडी करण्याच त्यांचा एक नवीन डाव आहे. हा विषय काय तो समजून घ्या.

Strait Of Hormuz : हॉर्मुज जवळच्या समुद्रात चीन-पाकिस्तानची खतरनाक चाल, भारताची कोंडी करण्यासाठी टाकला नवीन डाव
Jinping-Sharif
| Updated on: Apr 08, 2026 | 8:03 AM
Share

इराण युद्धामुळे सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुज सगळ्या जगभरात चर्चेत आहे. इराणने या मार्गावरील जलवाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे तेल संकट निर्माण झालं आहे. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. आता पाकिस्तानमुळे हॉर्मुज स्ट्रेट पुन्हा चर्चेत आलं आहे. पाकिस्तान या हॉर्मुज स्ट्रेट जवळ असलेला आपला जुना जिवानी एअरबेस पुन्हा विकसित करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रोजेक्टच्या विकासासाठी चीन पाकिस्तानला आर्थिक मदत देत आहे. चीन पाकिस्तानच्या या नव्या आघाडीमुळे क्षेत्रीय सुरक्षा समीकरणाचा विषय अजून संवेदनशील होणार आहे. जिवानी एअरबेस बलूचिस्तानच्या ग्वादर भागात आहे. रणनितीक दृष्ट्‍या हा एअरबेस खूप महत्वाचा मानला जातो.

जिवानी एअरबेसचं लोकेशन याला अजून खास बनवते. हॉमुर्ज स्ट्रेटच्या खूपच जवळ हा बेस आहे. इराणी सीमेपासून 34 किलोमीटर अंतरावर आहे. ओमानची खाडी आणि फारसची खाडी या प्रमुख समुद्री मार्गांजवळ हा बेस आहे. जगातील व्यस्ततम तेल मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हे महत्वाचं सैन्य ठिकाण बनू शकतं. लोकेशनमध्ये जिवानी एअरबेसच महत्व दडलेलं आहे. भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरापासून हा एअर बेस 100 ते 120 किलोमीटर लांब आहे.

चाबहार पोर्ट भारतासाठी अनेक कारणांमुळे महत्वाचा

चाबहार बंदरामुळे पाकिस्तानला बायपास करता येतं.

अफगाणिस्तान आणि थेट मध्य आशियापर्यंत पोहोचता येतं.

व्यापार आणि रणनितीक कनेक्टिविटी.

जिवानी एअर बेस चालू झाल्यास..

पाकिस्तानला चाबहार बंदरावर चालणाऱ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवता येईल.

संकट काळात भारताच्या सप्लाय लाइनवर त्यांना दबाव टाकता येऊ शकतो.

चीनची एन्ट्री

रिपोर्ट्सनुसार चीन या एअरबेसच्या अपग्रेडेशनसाठी मदत करत आहे. यामुळे हिंद महासागर क्षेत्रातील चीनची रणनिती अजून मजबूत होईल.

String of Pearls

ग्वादर (पाकिस्तान)

हम्बनटोटा (श्रीलंका)

जिबूती (आफ्रीका)

ही बंदरं आधीच चीनच्या ताब्यात आहे. त्याद्वारे चीन आपली सैन्य शक्ती मजबूत करत आहे.

जिवानी एअरबेस या साखळीतील एक नवीन सैन्य लिंक आहे.

भारतासाठी धोका काय?

चाबहार बंदरावर चीन-पाकिस्तानला लक्ष ठेवता येईल.

अरबी समुद्रातील ही चीन-पाकिस्तानची वाढती उपस्थिती.

युद्धकाळात समुद्री हालचालींना धोका.

आखाती देश आणि तेल पुरवठ्यावर रणनितीक नियंत्रण.

बदलतं समुद्री समीकरण.

पाकिस्तान चीनची ही नवीन भागीदारी फक्त एअरबेस पुरती मर्यादीत नाही, संपूर्ण हिंद महासागरातील रणनितीक संतुलन बदलण्याचा प्रयत्न आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप