जेल आहे की हॉटेल, इम्रान खान यांच्यावर तुरुंगात दर महिन्याला 12 लाखांचा खर्च

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. ते सध्या जेलमध्ये आहेत. पण कारागृह प्रशासनाने न्यायालयात दिलेल्या अहवालानुसार त्यांच्यावर तुरुंगात असताना महिन्याला तब्बल १२ लाख रुपयाहून अधिकचा खर्च होत आहे.

जेल आहे की हॉटेल, इम्रान खान यांच्यावर तुरुंगात दर महिन्याला 12 लाखांचा खर्च
imran khan
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 3:14 PM

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कारागृह अधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केलाय. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांच्या सुरक्षेवर सुमारे बारा लाखाहून अधिक मासिक खर्च केला जात आहे. तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला (LHC) याबाबतचा अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार, 71 वर्षीय इम्रान खान यांना तुरुंगाच्या परिसरात अनेक विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत. यामध्ये ५० हजार रुपयांचा स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला असून. जो ७ हजार कैद्यांवर नजर ठेवतोय.

इम्रान खान यांच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर

इमरान खान यांच्या जेवणासाठी सहाय्यक अधीक्षकांच्या देखरेखीखाली स्वतंत्र स्वच्छ स्वयंपाकघरात तयार केले आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना जेवण देण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी किंवा उपअधीक्षकांकडून त्यांची तपासणी केली जाते. माजी पंतप्रधानांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी होली फॅमिली हॉस्पिटलमधील सहा हून अधिक डॉक्टरांची टीम तैनात आहे, अतिरिक्त तज्ञ पथके नियमित तपासणी करत आहेत.

इम्रान खान यांना एकूण 7 सेलचे वाटप करण्यात आले आहेत. 2 सेलमध्ये ते राहत असून उर्वरित 5 सेल सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहेत. इम्रान खान यांच्या कोठडी जवळ कोणाला ही प्रवेश नाही. ५ सेलमध्ये साधारणपणे 35 कैद्यांना ठेवले जाऊ शकते. पण सुरक्षेच्या कारणास्तव ते रिकामे ठेवण्यात आले आहे. या परिसरात अतिशय कडक निर्बंध आहेत. इम्रान खान यांना भेटायचे असेल तर परवानगी घेतल्याशिवाय भेट दिली जात नाही. या कक्षाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानच्या न्यायालयाने इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवायची होती. दोन्ही नेत्यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांना निवडणूक देखील लढवता येणार नाहीये.

उच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध असला तरी लष्करासोबत सुरू असलेल्या वादामुळे त्यांना न्यायालयाकडून फारसा दिलासा मिळणार नसल्याचे मानले जात आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.