पाकिस्तानचा मोठा भ्याड हल्ला, सीमेवर प्रचंड तणाव, तब्बल 30 विद्यार्थी जखमी, अफगाणिस्तान..

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव बघायला मिळत आहे. सीमेवर प्रचंड तणाव असून मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला. ज्यात 30 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानचा मोठा भ्याड हल्ला, सीमेवर प्रचंड तणाव, तब्बल 30 विद्यार्थी जखमी, अफगाणिस्तान..
Pakistan attack
| Updated on: Apr 29, 2026 | 7:46 AM

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होत नाहीये. पुन्हा एकदा मोठा हल्ला पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला. ज्यात 4 लोक ठार झाले तर 70 लोक गंभीर जखमी आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे जखमींपैकी 30 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. अफगाणिस्ताने मोठा दावा करत म्हटले की, पाकिस्तानने पुन्हा मोठा हल्ला केला, ज्यात मोठे नुकसान झाले. अफगाणिस्तान सरकारचे उपप्रवक्ता हमदु्ल्लाह फितरत यांनी सोशल मिडिया प्लेटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा एकदा असदाबाद आणि मनवर जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मोर्टार आणि मिसाईलच्या मदतीने बॉम्ब हल्ला केला. ज्यात मोठे नुकसान झाले. अफगाणिस्तानने केलेल्या या दाव्यानंतर नेहमीप्रमाणे पाकिस्तानने याला नकार दिला.

पाकिस्तान सरकारने पोस्ट शेअर करत म्हटले की, पाकिस्तानकडून केली जाणारी कारवाई पूर्ण माहितीच्या आधारे आणि गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनंतर होते. त्यांनी अफगाणिस्तान यांच्याकडून करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे म्हटले. रेडिओ पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने बलूचिस्तानमधील त्यांच्या चेक पोस्ट नष्ट केल्या आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मोठे हल्ले एकमेकांवर करताना दिसत आहेत.

सीमेवर मोठा तणाव आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानच्या एका रूग्णालयावर केला होता. ज्यात 400 च्या जवळपास लोक ठार झाली होती. एक महिन्यापूर्वी झालेल्या या हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता झालेल्या हल्ल्यानंतर स्पष्ट होते की, चीनलाही मध्यस्थी करण्यात यश मिळाले नाही.

चीनच्या मध्यस्थीनंतरही अफगाणिस्तानवर मोठा हल्ला पाकिस्तानने केला आहे. दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. एकीकडे दोन देशांमध्ये युद्ध थांबवण्याकरिता पाकिस्तान मध्यस्थी करत आहे तर दुसरीकडे स्वत:च अफगाणिस्तानवर हल्ला करत आहे. यादरम्यान पाकिस्तान भारतावरही आरोप करत आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्री कायमच पाकिस्तानच्या नजरेत खुपसते. भारताने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.

Follow Us