भारताची चिंता वाढवणारी बातमी… रशिया-पाकिस्तानमध्ये मोठा करार, थेट JF-17 थंडर लढाऊ..

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने मोठा टॅरिफ भारतावर लावला. मात्र, त्यानंतरही भारताने तेल खरेदी कामय ठेवली. आता रशियाने भारताला अत्यंत मोठा धक्का दिला आहे. ज्यानंतर जगात एकच खळबळ उडाली.

भारताची चिंता वाढवणारी बातमी... रशिया-पाकिस्तानमध्ये मोठा करार, थेट  JF-17 थंडर लढाऊ..
Pakistan deal with Russia
| Updated on: Oct 03, 2025 | 10:37 AM

भारत आणि रशियातील मैत्री आतापासूनची नाही तर अनेक दशकांची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका भारताला रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणत आहे. भारताने अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता थेट रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. मात्र, आता रशियाने भारताला अत्यंत मोठा धोका दिला. भारताने मोठा विरोध केल्यानंतरही रशियाने पाकिस्तानच्या JF-17 थंडर लढाऊ विमानांसाठी RD-93MA इंजिन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा या कराराला अगोदरपासूनच मोठा विरोध होता. हा करार पाकिस्तान आणि चीनमधील संयुक्त JF-17 चा एक भाग आहे. मात्र, रशियाने हा करार केल्यानंतर भारताला चांगलाच मोठा धक्का बसलाय.

भारत रशियासोबत आपली मैत्री कायम ठेवण्यासाठी अमेरिकेसोबत पंगा घेत असताना रशियाने मात्र, भारताच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून थेट पाकिस्तानच्या JF-17 थंडर लढाऊ विमानांसाठी RD-93MA इंजिन पुरवण्याचा निर्णय घेतला. आता याचा परिणाम थेट रशिया आणि भारतातील संबंधांवर होऊ शकतो. भारत आणि रशिया अनेक वर्षांचे धोरणात्मक भागीदार आहेत. पाकिस्तानी हवाई दलाला ब्लॉक-III प्रकार मिळणार आहे.

ज्यामुळे त्यांची क्षमता अधिक वाढले आणि याचा फटका थेट भारताला बसू शकतो. पाकिस्तान भारताच्या विरोधातच ही विमाने वापरेल. आरडी-93 इंजिन प्रसिद्ध रशियन कंपनी क्लिमोव्ह डिझाइन ब्युरोने तयार केले आणि ते प्रामुख्याने मिकोयान मिग-29 लढाऊ विमानासाठी डिझाइन केले होते. संरक्षण तज्ञांचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानकडून जेएफ-17 विमानांची संख्या वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे.

पाकिस्तानच्या JF-17 थंडर लढाऊ विमानांसाठी RD-93MA इंजिन पुरवण्याचा निर्णय रशियाने घेतल्याने भारत आता काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. कारण भारताने हे इंजिन पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता. भारताच्या विरोधानंतरही हे इंजन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारत आणि रशियातील अनेक वर्षांचे चांगले संबंध या निर्णयामुळे तणावात येण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानला उत्तर दिले, त्यानंतर पाकिस्तान आपली लष्कर ताकद वाढवत असल्याचे दिसतंय.