
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून पाकिस्तानशी जवळीकता वाढवताना दिसत आहेत. हेच नाही तर दुसऱ्यांदा पाकिस्तानचे लष्करप्रमुख अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान देखील त्यांच्यासोबत होते. जवळपास 90 मिनिटे डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यात बैठक झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर पाकिस्तान दुसऱ्या देशांसोबत संरक्षण करार करत फिरतोय. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र, भेटीच्या काही तासांंमध्येच डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका मोठा धक्का पाकिस्तानने दिलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीच्या काही तासांनीच चीन, रशिया आणि इराणसह संयुक्त निवेदन जारी करून डोनाल्ड ट्रम्पच्या बगराम एअरबेसच्या योजनेला विरोध थेट पाकिस्तानने केला. चारही देशांनी सांगितले की, बगराम एअरबेस अमेरिकेच्या ताब्यात घेणे प्रादेशिक शांततेसाठी अत्यंत धोक्याचे आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे बगराम एअरबेससाठी चांगलेच आग्रही असल्याचे बघायला मिळतंय. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बगराम एअरबेसवर आपला ताबा हवाय.
अफगाणिस्तानला स्वतंत्र आणि शांततापूर्ण राज्य म्हणून ठेवणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे, यावर यादरम्यान भर देण्यात आला. अफगाणिस्तान सरकारला दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध ठोस पावले उचलण्याचे आणि मानवतावादी मदतीला राजकीय परिस्थितीपासून ठेवण्याचे आवाहन या चार देशांनी केले आणि हा अत्यंत मोठा झटका नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणावा लागेल. यामुळे तालिबानला एक मोठी ताकद मिळाली आहे.
तालिबानने देखील आता आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, पुढील 20 वर्षे अमेरिकेशी लढण्यास तयार आहोत, परंतु बगराम एअरबेसबाबत आता अजिबात तडजोड केली जाणार नाही. अमेरिकेच्या विरोधात अनेक देश एकवटताना यावरून स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेतील मागील काही दिवसातील संबंध चांगल असताना देखील पाकिस्तानने रशिया आणि इराणसोबत मिळून ट्रम्पच्या धोरणांविरुद्ध एर निवेदन थेट जारी केले. हा मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणाला लागेल.