अमेरिकेने BLA वर बंदी घातल्यानंतर भीषण हल्ला, 9 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होते. बलुचिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान 40 ते 50 बंडखोरांनी हा हल्ला केला.

अमेरिकेने BLA वर बंदी घातल्यानंतर भीषण हल्ला, 9 पाकिस्तानी सैनिक ठार
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भीषण हल्ला
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 13, 2025 | 3:32 PM

ही बातमी पाकिस्तानमधून आहे. बलुचिस्तानच्या वाशुक जिल्ह्यातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, डझनभर दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशन आणि निमलष्करी दलाच्या मालावर हल्ला केला. तर नाव न छापण्याच्या अटीवर ते म्हणाले की, पाकिस्तानी सैनिक त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जात असताना बंडखोरांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत किमान 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे नऊ जवान शहीद झाले. या हल्ल्यात मोठ्या संख्येने सैनिकही जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला (BLA) अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले त्याच दिवशी हा हल्ला झाला. वाशुक जिल्ह्यातील या हल्ल्यात डझनभर बंडखोरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर बंडखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू करण्यात येत आहे.

पोलिस ठाणे आणि लष्करी छावणीवर हल्ला

बलुचिस्तानच्या वाशुक जिल्ह्यातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, डझनभर दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशन आणि निमलष्करी दलाच्या मालावर हल्ला केला. नाव न छापण्याच्या अटीवर ते म्हणाले की, पाकिस्तानी सैनिक त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जात असताना बंडखोरांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत किमान नऊ जवान शहीद झाले आहेत. तर मोठ्या संख्येने सैनिक जखमी झाले आहेत.

40 ते 50 बंडखोरांनी हल्ले केले

प्रांताच्या गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने AFP ला सांगितले की, “दुचाकीवर सुमारे 40 ते 50 दहशतवादी होते ज्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला आणि गोळीबार केला. त्यात 9 जवान ठार झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. या हल्ल्यात आणखी सहा जवान जखमी झाले आहेत. वाशुक जिल्ह्यातील बासिमा शहरातील पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या फ्रंटियर कॉर्प्स कंपाऊंडवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याची माहिती प्रांतीय गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘या’ हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही

या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नसली तरी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या भागात सर्वाधिक सक्रिय आहे. या हल्ल्यामागे बीएलएचा हात असल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. बीएलएने या भागात पाकिस्तानी सैन्याला नाकात ठेवले आहे.

त्यामुळेच बलुचिस्तानच्या अनेक भागात पाकिस्तानी लष्कर बंडखोरांना पकडण्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करत आहे. बलुच फुटीरतावादी आणि मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे की, लष्कराने बंडखोरीला दिलेल्या कठोर प्रतिक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात बेपत्ता आणि हत्या झाल्या आहेत.