पाकिस्तानातील महिला भारतात नोकरीला; ही गोष्ट उघड होताच त्या शिक्षिकेला केलं निलंबित; 1992 ते 2015 पर्यंत केली सरकारी नोकरी

| Updated on: Sep 03, 2022 | 8:44 AM

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील या महिलेने 1992 ते 2015 पर्यंत सरकारी नोकरी केली आहे, त्यानंतर नोकरी करणारी महिला पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आल्यानंतर मात्र 2015 मध्ये ही गोष्ट उघड झाल्यानंतर 9 मार्च 2021 मध्ये त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे या महिला शिक्षिकेने आता न्यायालयात धाव घेतली आहे, त्यावर आता सुनावणी सुरू झाली आहे.

पाकिस्तानातील महिला भारतात नोकरीला; ही गोष्ट उघड होताच त्या शिक्षिकेला केलं निलंबित; 1992 ते 2015 पर्यंत केली सरकारी नोकरी
Follow us on

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये (Rampur Uttar Pradesh) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपली ओळख लपवून पाकिस्तानातील एक महिला रामपूरमध्ये शिक्षिकेची नोकरी (Teacher Job) करत असल्याचे उघडकीस आले आहे. ही गोष्ट कित्येक वर्षानंतर उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने आता या महिलेला नोकरीवरुन काढून टाकले आहे, त्यामुळे मूळची पाकिस्तानातील असलेल्या या महिलेने आता न्यायालयात धाव घेतली आहे.लग्नानंतर पाकिस्तानी नागरिक (Pakistani citizens) झालेल्या महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर त्या पुन्हा भारतात परतल्या. त्या भारतात आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमध्येच सरकारी नोकरीही मिळवली. ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आल्यानंतर मात्र शिक्षिका असलेल्या महिलेला तत्काळ निलंबित करण्यात आले. महिलेला नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे आता शिक्षिका असलेल्या या महिला न्यायालयाचे दार त्यांनी ठोठवले आहे.

आणि सरकारी नोकरी मिळाली

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील या महिलेने 1992 ते 2015 पर्यंत सरकारी नोकरी केली आहे, त्यानंतर नोकरी करणारी महिला पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आल्यानंतर मात्र 2015 मध्ये ही गोष्ट उघड झाल्यानंतर 9 मार्च 2021 मध्ये त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे या महिला शिक्षिकेने आता न्यायालयात धाव घेतली आहे, त्यावर आता सुनावणी सुरू झाली आहे.

पाकिस्तानी नागरिकत्त्व

शिक्षण खात्यात अधिकारी असणाऱ्या कल्पना सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानी नागरिक असलेल्या या महिलेचे नाव फरजाना बी उर्फ मायरा आहे. फरजाना यांचा जन्म रामपूरचा असून त्यांचे शिक्षणही येथेच झाले आहे. ऑगस्ट 1979 पासून ऑक्टोबर 1981 पर्यंत फरजाना पाकिस्तानमध्ये राहिल्या होत्या. त्यावेळी फरजाना यांना पाकिस्तान नागरिकत्व मिळाले होते. त्यानंतर त्या ऑक्टोबर 1981 मध्ये त्या भारतात आल्या आणि त्यांनी भारतातीलच एका नागरिकाबरोबर लग्न केले, त्या लग्नाचे त्यांनी रितसर प्रमाणपत्रही सादर केले आहे.

शिक्षक म्हणून सेवेतून मुक्त

फरजाना यांची नियुक्ती 15 जानेवारी 1992 मध्येच करण्यात आली होती, मात्र त्या पाकिस्तानी असल्याची गोष्ट समोर आल्यानंतर मात्र त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले तर त्यानंतर 9 मार्च 2021 रोजी त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले, त्यामुळे त्यानंतर फरजाना यांनी नोकरीतील निलंबन आणि सेवेतून मुक्त करण्यात आल्याने त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली असून त्यावर सुनावणी सुरू आहे.