PM Imran Khan : तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा, पाच वर्षे निवडणूक…

Toshakhana case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

PM Imran Khan : तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा, पाच वर्षे निवडणूक...
| Updated on: Aug 05, 2023 | 2:02 PM

मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तोशाखाना प्रकरणात (Toshakhana case) पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची खात्री झाल्यामुळे शनिवारी इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने त्यांना एक लाख रुपयांचा दंड केला आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी (Islamabad police) त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कधीही अटक करु शकतात.

ज्यावेळी सुनावणी सुरु होती. त्यावेळी न्यायाधीश म्हणाले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अप्रामाणिकपणा दाखवला आहे. तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रानवर खानवरती अधिक दिवस खटला सुरु होता. आजच्या कोर्टाच्या निर्णयामुळे इम्रान खान याचे राजकीय कारकीर्द संपल्याची सगळीकडं चर्चा सुरु झाली आहे.

तोशाखाना प्रकरणात दोषी आढळल्यामुळे इम्रान खान पुढची पाच वर्षे निवडणुक लढवू शकत नाहीत. काही दिवसात पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत आपला पक्ष जिंकेल असा विश्वास इम्रान खान यांनी अनेकदा व्यक्त केला होता.

काय आहे तोशाखाना प्रकरण

इमरान खान यांना जगभरातून ज्या काही भेट वस्तू मिळाल्या. त्या सगळ्या भेटवस्तू इम्रान खान यांना पाकिस्तानच्या तोशाखानामध्ये त्यांना जमा करायच्या होत्या. परंतु इम्रान खान यांनी त्या वस्तू जमा केल्या नाहीत. त्याचबरोबर त्या वस्तूंची विक्री केली आणि त्याचे पैसे घेतले. तसेच ते पैसे स्वत:कडे ठेवले या कायद्याचं उल्लंघन झालं आहे. तोशाखाना प्रकरण मागच्या काही दिवसांपासून अधिक गरम झालं होतं.