सूर्याचा एक भाग तुटला? खगोल शास्त्रज्ञ चिंतेत, कम्युनिकेशनवर परिणाम पडणार?

| Updated on: Feb 11, 2023 | 2:59 AM

काही शास्त्रज्ञ हा सूर्याचा कडा असल्याचं संबोधत आहेत जो सूर्यापासून वेगळा झाल्याचं मानत आहेत. सूर्याभोवती झालेल्या या बदलाचा थेट परिणाम हा कम्युनिकेशनवर पडण्याची शंका व्यक्त केली जातेय.

सूर्याचा एक भाग तुटला? खगोल शास्त्रज्ञ चिंतेत, कम्युनिकेशनवर परिणाम पडणार?
Follow us on

न्यूयॉर्क : जगभरातील खगोल शास्त्रज्ञांकडून सूर्यमालेचा दररोज अभ्यास केला जातो. सूर्यमालेत होणाऱ्या बदलांचा शास्त्रज्ञांकडून अतिशय बारकाईने अभ्यास केला जातो. विशेष म्हणजे अगदी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणापर्यंतच्या घडामोडी शास्त्रज्ञ टेलिस्कोपमधून पाहत असतात. अवकाशात होणाऱ्या अतिशय सुक्ष्म बदलांकडे खगोल शास्त्रज्ञांचं बारीक लक्ष असतं. अवकाशात घडणाऱ्या विविध घटनांचा आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल होणार आहेत का? याची शाहानिशा शास्त्रज्ञांकडून केली जाते. त्यामुळे आपण बिंधास्त असतो. विशेष म्हणजे अवकाशात होणाऱ्या बदलांविषयी एक मोठी बातमी समोर आलीय.

खगोल शास्त्रज्ञांना टेलिस्कोपमध्ये सूर्याभोवती आगीचं चक्रीवादळ पाहायला मिळालंय. त्यामुळे शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढलं आहे. सूर्यभोवती तयार झालेल्या आगीच्या ज्वाळा म्हणजे सूर्याचाच एक भाग असून तो सूर्यापासून दूर झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

हे सुद्धा वाचा

काही शास्त्रज्ञ हा सूर्याचा कडा असल्याचं संबोधत आहेत जो सूर्यापासून वेगळा झाल्याचं मानत आहेत. सूर्याभोवती झालेल्या या बदलाचा थेट परिणाम हा कम्युनिकेशनवर पडण्याची शंका व्यक्त केली जातेय.

सूर्याच्या उत्तर ध्रुव भागातील घटना

सूर्याच्या उत्तर ध्रुव भागात हा बदल बघायला मिळतोय. सूर्याचाच हा भाग असून तो वेगळा होताना दिसत असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे खगोल अभ्यासकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत एका ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आलाय.

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपमध्ये हे रेकॉर्ड झालंय. या व्हिडीओला गेल्या आठवड्यात स्पेस वेदर फोरकास्टर डॉ. तमिता स्कोव यांनी ट्विटरवर शेअर केला होता.

सूर्यामधून हाय एनर्जी रेडिएशन निघते. यालाच सोलर फ्लेयर्स असं संबोधतात. याच हाय एनर्जी रेडिएशनमुळे पृथ्वीवर कम्युनिकेशनवर परिणाम पडतो. त्यामुळे आता सूर्यावर जे बदल घडले आहेत त्याचा पृथ्वीवर काही परिणाम पडू शकतो का? याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.

“या चक्रीवादळावर बोला! सूर्याच्या उत्तर ध्रुव भागात एक कडा पृष्ठभागापासून वेगळा झालाय आणि चारही बाजूने घिरट्या घालत आहे. तिथे 55 अंशावर उसळलेल्या सौरज्वाळावर मोठ्या ऐट्मॉस्फेरिक डायनमिक्सवर वाढवून-चढवून सांगितलं जाऊ शकत नाही”, असं डॉ. स्कोव ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

यूएस नेशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचे सोलार फिजिसिस्ट स्कॉट मैकिन्टोश यांनी स्पेस डॉट कॉमला प्रतिक्रिया दिलीय. आपण याआधी सूर्यापासून कुठला भाग वेगळा झालेला पाहिलेला नाही, असं त्यांनी सांगितलंय. तसेच आपण अनेक दशकांपासून सूर्यावर संशोधन करत आहोत, पण असं कधीच बघितलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

याआधी अशाप्रकारची घटना घडलेली नाही. त्यामुळे या घटनेवर शास्त्रज्ञांकडून चिंता व्यक्त केली जातेय. नासाचे शास्त्रज्ञ तसेच जगभरातील खगोल अभ्यासक अवकाशात होणाऱ्या बदलांकडे बारकाईने लक्ष ठेवून अभ्यास करत आहेत.