Petrol-Diesel Crisis : पंपावर पेट्रोल-डिझेल मिळेना, वाहनधारकांचं टेन्शन वाढलं, कोणत्या देशाची झाली दयनीय अवस्था?

फ्रान्समध्ये नऊ पैकी एका पंपावर पेट्रोल-डिझेल मिळेना झालं आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटका फ्रान्समधील नागरिकाना बसू लागला आहे.

Petrol-Diesel Crisis : पंपावर पेट्रोल-डिझेल मिळेना, वाहनधारकांचं टेन्शन वाढलं, कोणत्या देशाची झाली दयनीय अवस्था?
Fuel crisis
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 2:15 PM

पश्चिम आशिया, होर्मुझची सामुद्रधुनीवरील तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. जगातील अनेक देशात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता आणखी एका देशाला इंधन तुटवड्याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्ताननंतर फ्रान्समध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. फ्रान्समध्ये नऊ पैकी एका पेट्रोल पंपावर इंधन संपलं आहे. त्यामुळे वाहनधराकांना इंधनाविना माघारी फिरावे लागत आहे.

इंधन तुटवड्याचा आता मोठा फटका फ्रान्स देशाला बसण्यास सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये पुरवठा न झाल्याने पेट्रोल पंपावर तुटवडा जाणवू लागला आहेत. डिझेलची सरासरी किंमत ही 2.39 युरो प्रति लीटरहून अधिक झाली आहे. फ्रान्समध्ये इंधनाच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. या देशातील 700 हून अधिक पेट्रोल पंपावर उच्च श्रेणीच्या डिझेलची किंमत 2.50 युरो प्रति लीटरहून अधिक आहे. काही पंपावर दर हा 2.70 युरो प्रति लिटर इतका पोहोचला आहे.

पाकिस्ताननंतर आता फ्रान्स देशावर इंधनाचं संकट आलं आहे. फ्रान्समधील जनता पहिल्यांदा इंधन तुटवड्याचा सामना करत असल्याचे बोलले जात आहे. तसेच डिझेलचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे. सरकारने ताजे आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, देशातील 11 टक्के पेट्रोल पंप म्हणजे नऊ पैकी एका पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत आहे. ग्रँड एस्टमध्ये जवळपास 16 टक्के पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा सामना करावा लागत आहे. सेंटर-वाल द लोआर आणि ओक्सिटानीमध्ये १४ टक्के तुटवडा जाणवतोय.तर पे द ला लोआरमध्ये १३ टक्के तुटवड्याची नोंद झाल्याचे समोर आलं आहे.  सौदी अरेबियाने तेल पुरठव्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे युरोपीताल इंधन पुरठव्यावर परिणाम पाहायला मिळत आहे. यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी जी-7 ला आपत्कालीन साठा जारी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जी-7 नेत्यांची बैठक बोलावण्याची योजना जाहीर केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us