India-China Relation : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ‘या’ देशाने थेट चीनला दिली धमकी

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकताच एका देशाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्या देशाला बळ मिळालय. त्यांनी थेट चीनला धमकी दिली आहे. आम्ही आमच्या शत्रुंविरोधात कारवाई करु असं त्या देशाच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

India-China Relation : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर 'या' देशाने थेट चीनला दिली धमकी
South China Sea
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 10:21 AM

दक्षिण चीन सागराच्या हद्दीवरुन अनेक दशकापासून फिलीपीन्स आणि चीनमध्ये वाद आहे. आता हा वाद वाढत चालला आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात फिलीपीन्सच जहाज आणि चिनी तट रक्षक दलामध्ये झडप झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. फिलीपीन्स, वियतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई या नैसर्गिक साधन संपत्तीने समुद्ध असलेल्या व्यस्त जलमार्गावर चीन नेहमीच आपला दावा सांगत आलाय. नुकताच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फिलीपीन्सचा दौरा केला. दक्षिण चीन सागरी वादात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं भारताने फिलीपीन्सला सांगितलं. चिनी तट रक्षक दलाच्या हल्ल्यानंतर फिलीपीन्सच्या राष्ट्रपतींनी गुरुवारी भूमिका जाहीर केली. दक्षिण चीन सागरात चिनी तट रक्षक दल आणि मिलिशिया जहाजांच्या हल्ल्याविरोधात कारवाई करु. फिलीपीनी झुकत नाहीत असही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस यांनी पुढच्या काही आठवड्यात सरकार काय करावाई करणार? त्या बद्दल माहिती दिलेली नाही. पण आम्ही आमच्या शत्रुंविरोधात कारवाई करु असं त्यांनी म्हटलं आहे. चिनी तट रक्षक दल आणि फिलीपीन्सच्या जहाजामध्ये समुद्रात संघर्ष झाला. “चिनी तट रक्षक दल आणि चिनी समुद्री मिलिशिया एजंटचे हल्ले चुकीचे आहेत. आम्ही या खतरनाक हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ” असं मार्कोस यांनी एक्सवर लिहिलय. “आम्हाला कुठल्याही देशासोबत वाद नकोय. खासकरुन आमचे मित्र असल्याचा दावा करणाऱ्या देशांसोबत संघर्ष करायचा नाहीय. पण आम्ही गप्प बसणार नाही. फिलीपीनी झुकणार नाहीत” असं त्यांनी म्हटलं आहे.

जयशंकर यांच्या दौऱ्यानंतर धमकी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकताच फिलीपीन्सचा दौरा केला. या धमकीला जयशंकर यांच्या दौऱ्याशी जोडल जात आहे. कारण राष्ट्रपति फर्डिनेंड मार्कोस यांनी हे वक्तव्य जयशंकर यांच्या दौऱ्यानंतर केलं. फिलीपीन्स सारखाच भारताचा चीनसोबत LAC वर वाद सुरु आहे.

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.