भारतीय नौदलात हवे तिथे जाण्याचे धाडस, फिलिपिन्सच्या राजदूताने का केले कौतुक, जाणून घ्या

फिलिपाईन्सचे माजी परराष्ट्रमंत्री आणि ब्रिटनमधील सध्याचे राजदूत टिओडोरो 'टेडी बॉय' लोपेझ लोकसिन ज्युनियर यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे. भारतीय नौदलात हवे तिथे जाण्याचे धाडस आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय नौदलात हवे तिथे जाण्याचे धाडस, फिलिपिन्सच्या राजदूताने का केले कौतुक, जाणून घ्या
Navy
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 14, 2025 | 2:58 PM

फिलिपाईन्स आणि फिलिपाईन्सच्या नौदलाने राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यापूर्वी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील पश्चिम फिलिपिन्स समुद्रात संयुक्त नौदल सराव केला आहे. एका विश्लेषकाने याचे वर्णन “दक्षिण चीन समुद्राच्या विस्तीर्ण पाण्यातील आणि चीनने दावा केलेला भाग” असे केले. तर फिलिपाईन्सचे माजी परराष्ट्रमंत्री आणि ब्रिटनमधील सध्याचे राजदूत टिओडोरो ‘टेडी बॉय’ लोपेझ लोकसिन ज्युनियर यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे. यामागचा हेतू किंवा यामागची कारणं काय आहे, याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घ्या.

भारतीय नौदल आणि फिलिपाईन्सच्या नौदलाने नुकताच दक्षिण चीन समुद्रापासून काही अंतरावर संयुक्त सराव केला. फिलिपाईन्समध्ये या सरावाची जोरदार चर्चा सुरू असून भारतीय नौदलाचे भरभरून कौतुक होत आहे. फिलिपाईन्सचे माजी परराष्ट्रमंत्री आणि युनायटेड किंग्डममधील सध्याचे राजदूत टिओडोरो ‘टेडी बॉय’ लोपेझ लोसिन ज्युनिअर यांनी एक्सवर भारतीय नौदलाबद्दल लिहिले आहे.

‘’भारतीय नौदल हे एकमेव नौदल आहे ज्यात हवे तिथे जाण्याचे धाडस आहे. यावेळी त्यांनी पश्चिम नौदलावर निशाणा साधत पाश्चिमात्य नौदल कॅस्ट्रॅटीसारखे अकॅपेला गाते,’’ असे राजदूताने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

कॅस्ट्रॅटी हे ते पुरुष गायक आहेत जे प्रामुख्याने चर्चच्या गायन आणि ऑपेरा हाऊसमध्ये मोठ्याने गातात. त्यांच्या आवाजाची उच्च उंबरठा राखण्यासाठी त्यांना यौवनाच्या आधी नपुंसक केले जाते. नुकत्याच झालेल्या भारत-फिलिपाईन्स सरावाबाबत ईएक्सवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना फिलिपिन्सचे राजदूत बोलत होते.

भारत-फिलिपाईन्स नौदल सराव

फिलिपाईन्स आणि फिलिपाईन्सच्या नौदलाने राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यापूर्वी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील पश्चिम फिलिपिन्स समुद्रात संयुक्त नौदल सराव केला आहे. एका विश्लेषकाने याचे वर्णन “दक्षिण चीन समुद्राच्या विस्तीर्ण पाण्यातील आणि चीनने दावा केलेला भाग” असे केले. एका एक्स युजरने या अ‍ॅनालिस्टला विरोध करत लिहिलं की, “हे चीनचे सागरी क्षेत्र नाही. फिलिपाईन्सच्या EEZ (एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन) मध्ये हा सराव झाला. हे चीनच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर आहे. ‘

भारतीय नौदलाचे कौतुक

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना टेडी लोकसिन ज्युनिअरने भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या सरावाचा संदर्भ देत आणखी एका एक्स युजरने सांगितले की, फिलिपाईन्सचे EEZ हे चीनचे अंगण नाही. या भागात भारत-फिलिपाईन्स गस्ती सराव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये पश्चिम फिलिपाईन्स समुद्रातही दोन्ही नौदलांनी असाच संयुक्त सराव केला आहे.