क्षणात सगळं संपलं…! प्रवाशांना घेऊन जाणारं विमान शेतात कोसळलं, 13 जणांचा जागीच मृत्यू

प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अचानक शेतात कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

क्षणात सगळं संपलं...! प्रवाशांना घेऊन जाणारं विमान शेतात कोसळलं, 13 जणांचा जागीच मृत्यू
| Updated on: Aug 02, 2026 | 12:07 PM

यूरोपच्या पर्यटकांना घेऊन नाझ्का लाइन्सला घेऊन जाणारं विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानातील जागीच मृत्यू झाला आहे. विमानाच्या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नाझ्का नगरपालिका प्रशासनाने सोशल मीडियावर माहिती देत घटनेला दुजोरा दिला आहे. विमानातील सर्व प्रवासी नाझ्का लाइन्स येथे जात होते. परंतु वाटेत त्यांचा करुण अंत झाला.

नाझ्का लाइन्स येथे शेकडो वर्षांपूर्वी वाळवंटात राहणाऱ्या स्थानिकांनी प्रचंड मोठी चित्रे काढली होती. जमिनीवर काढलेल्या चित्रात विविध प्राण्यांचा समावेश आहे. विमानातूनही ही चित्रे पाहतात येतात. नाझ्का प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने इका शहरातून उड्डाण केलं होतं. विमान हे एरोडियाना खासगी विमान कंपनीचे होते. एअरलाइन्सच्या माहितीनुसार, ही कंपनी मागील 14 वर्षांपासून व्यवसायात आहे. या कंपनीच्या विमानातून हजारो प्रवासी नाझ्का लाइन्सची हवाई सहल करत असतात.

विमान अपघातानंतर पेरूच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या विमान अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. विमान कंपनीने अपघाताविषयी अद्याप कोणतही निवेदन जारी केलेलं नाही. स्थानिक प्रशासनाकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे कामही सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us