
PM नरेंद्र मोदी आजपासून (मंगळवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळी भूतानच्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. मोदींचा हा दौरा भूतानसारख्या देशासाठी खूप खास आहे. या दौऱ्यात त्यांनी भूतानच्या पंतप्रधानांचीही भेट घेतली. या दौऱ्याबद्दल भूतानीज वृत्तपत्राचे संपादक तेनझिंग लामसांग यांनी मोदींचे कौतुक केले आहे. दिल्लीतील स्फोटानंतर मोदी भूतानला भेट देतील की नाही याबाबत शंका होती, मात्र ते भूतान दौऱ्यावर आल्याने आम्हाला आनंद झाला असं तेनझिंग लामसांग यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले तेनझिंग लामसांग?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूतान दौऱ्याबद्दल बोलताना तेनझिंग लामसांग यांनी म्हटले की, दिल्लीतील स्फोटानंतर आम्हाला शंका होती की ते या दौऱ्यावर येतील की नाही. मात्र ते भूतानला आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. ही त्यांची भूतानसोबत असलेल्या संबंधांबद्दलचे प्रेम आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 साली भूतानला पहिल्यांदा भेट दिल्यापासून दोन्ही देशांमधील नाते वाढले आहे.
पुढे तेनझिंग लामसांग यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यावेळेसचा दौरा केवळ दोन्ही देशांनी बांधलेल्या 1020 मेगावॅट पुनातसांगचु II जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी नाही, तर 1972 पासून भूतान-भारत संबंधांमध्ये मुख्य भूमिका बजावलेले चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांचा सन्मान करण्यासाठी आहे. आज त्यांची 70 जयंती आहे.
After the blast in Delhi we were wondering if PM Modi would be able to make it but Bhutan was pleasantly surprised that he came.
This is his commitment to an important relationship in the region, one that he has helped nurture since 2014 making his first foreign visit to Bhutan.
— Tenzing Lamsang (@TenzingLamsang) November 11, 2025
पंतप्रधान मोदींचा हा दौरा भूतानने आयोजित केलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवासाठीही खास आहे. यात अनेक देशांचे बौद्ध गुरु भूतानमध्ये जागतिक शांततेसाठी प्रार्थना करतात. पंतप्रधान मोदींनीही यात भाग घेतला आहे. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात गेलेफू माइंडफुलनेस सिटीला रेल्वे जोडणी आणि भारताच्या बाजूला इमिग्रेशन चेक-पोस्टची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींनी चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मोदींनी दिल्ली हल्ल्यावरही भाष्य केले. भूतानचे राजे महामहिम राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील पीडितांसाठी प्रार्थना केली आणि भारताच्या कल्याणासाठी आणि यशासाठी प्रार्थना केली असंही तेनझिंग लामसांग यांनी म्हटलं आहे.