PM मोदींच्या इस्रायल दौऱ्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली, नेतन्याहू यांच्या विधानामुळे इस्लामिक देश हादरले

PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळे पाकिस्तानसह इस्लामिक देशांची झोप उडाली आहे. कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते. त्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे.

PM मोदींच्या इस्रायल दौऱ्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली, नेतन्याहू यांच्या विधानामुळे इस्लामिक देश हादरले
Modi Israel Visit
Image Credit source: X
| Updated on: Feb 25, 2026 | 6:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर गेले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे पत्नी सारा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. या भेटीचा प्राथमिक उद्देश भारताचे इस्रायलशी असलेले धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळे पाकिस्तानसह इस्लामिक देशांची झोप उडाली आहे. कारण काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक विधान केले होते, ज्यामुळे आखाती देशांची चिंता वाढली आहे.

बेंजामिन नेतान्याहू यांच्या विधानामुळे इस्लामिक देशांची झोप उडाली

पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा इस्लामिक देश वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कारवायांवर टीका करत आहेत. यामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झालेला आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कट्टरपंथी शिया आणि सुन्नी लोकांचे धोका म्हणून वर्णन केले होते, तसेच भारत, ग्रीस, सायप्रस आणि अनेक अरब, आशियाई आणि आफ्रिकन देशांशी युती करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले आहेत. याच कारणामुळे पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांची झोप उडाली आहे.

पाकिस्तानने काय म्हटले?

पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमे पंतप्रधान मोदींच्या इस्रायल भेटीला एक धोक्याची घंटा म्हणत आहेत. पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’ने म्हटले आहे की, ‘भारत आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंध 1992 मध्ये प्रस्थापित झाले होते. मात्र 2014 मध्ये मोदींनी सत्ता हाती घेतल्यापासून हे संबंध आणखी सुधारले आहेत. कारण पंतप्रधान मोदींनी 2017 मध्ये इस्रायलचा दौरै केलै होता, त्यानंतर नेतान्याहू यांनी भारताला भेट दिली होती. डॉन वृत्तपत्राने असेही म्हटले आहे की, “मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला तेव्हा पाकिस्तानविरुद्ध संरक्षण रणनीती म्हणून इस्रायली लष्करी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.”

महत्त्वाची बाब म्हणजे भारताचे इस्रायलसह इतर आखाती देशांशी आणि इराणशी मजबूत संबंध आहेत. भारताने इराणचे चाबहार बंदर विकसित केले आहे, जे अफगाणिस्तानचे व्यापारी प्रवेशद्वार आहे. तसेच भारताचे अफगाणिस्तानातील तालिबान अधिकाऱ्यांशीही चांगले संबंध आहेत. अशातच पाकिस्तानी टीव्ही चॅनेल जिओ न्यूजने ‘मोदींचा इस्रायल दौरा पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा’ असं म्हटलं आहे.

इस्लामिक दहशतवादाला भारत आणि इस्रायलचा विरोध

कतारमधील चॅनेल अल जझीराने म्हटले की, 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारत आणि इस्रायलमधील संबंधांमध्ये मोठा बदल झाला आहे. 2017 मध्ये, पंतप्रधान मोदी इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले होते. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत इस्रायलचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार बनला आहे. भारत आणि इस्रायल दोघेही इस्लामिक दहशतवादाला एक मोठा धोका मानतात. ही सर्व इस्लामिक देशांसाठी चिंतेची बाब आहे.