भारताकडून थायलंडच्या राजाला बुद्धमूर्ती, राणीला शॉल, अन् पंतप्रधानांनाही खास भेट; जाणून घ्या नेमकी विशेषता काय?

| Edited By: | Updated on: Apr 04, 2025 | 7:46 PM
1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या दौऱ्यादरम्यान, थायलंड सरकारतर्फे नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना काही भेटवस्तूही दिल्या. दरम्यान, आता भारतानेही थायलंडचा राजा, राणी आणि पंतप्रधानांना तसेच पंतप्रधानांच्या पतीला यासह थायलंडच्या माजी पंतप्रधानांना भेटवस्तू दिल्या आहेत.

2 / 6
भारतातर्फे थायलंडच्या राजाला  सारनाथ बुद्धमूर्ती भेट म्हणून देण्यात आली आहे. ही मूर्ती पितळाची असून यात गौतम बुद्ध ध्यानमुद्रेत बसलेले आहेत. ही मूर्ती म्हणजे बौद्ध धर्मातील अध्यात्मिकता तसेच भारतीय कलेचा उत्तम नमुना आहे. ही मूर्ती सारनाथ शैलीची आहे. या मूर्तीची निर्मिती बिहारमध्ये करण्यात आली आहे.

3 / 6
भारताने थायलंडच्या राणीलाही ब्रोकेड रेशमी शॉल भेट म्हणून दिली आहे. ही शॉल म्हणजे भारतातील उत्कृष्ट आणि समृद्ध विणकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. भारतातील सर्वोतकृष्ट आणि उच्च दर्जाच्या रेशमापासून ही शॉल तयार करण्यात आली आहे. या शॉलवर एक गाव चित्रित करण्यात आले आहे. भारतीय मनिएचर आणि पिचवाई कलेतून प्रेरणा घेऊन या शॉलवर निसर्ग तसेच उत्सवाचेही चित्रण करण्यात आले आहे.

4 / 6
भारताने थायलंडच्या पंतप्रधानांन  डोक्रा ब्रासपासून बनवलेली एक पिकॉक बोट भेट म्हणून दिलेली आहे. या बोटीवर एक आदिवासी बसलेला दिसत आहे. छत्तीसगडमधील आदिवासी समूदायापासून या धातू हस्तकलेचा उगम झालेला आहे. व्हॅक्स कास्टिंग तंत्राचा वापर करून ही कलाकृती तयार करण्यात आलेली आहे.

5 / 6
थायलंडच्या पंतप्रधानांच्या पतींनाही भारताने गोल्ट प्लेटेड टायगर मोटिफ असलेले कफलिंक्स फेट म्हणून दिलेले आहेत. या कफलिंकना सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या कफलिंकवर वाघाचा चेहरा आहे. हा वाघ म्हणजे  धाडस, नेतृत्त्वाचे प्रतिक आहे. गुजरात आणि राजस्थानमधील मीनाकारी कलेच्या मदतीने हे कफलिंक्स तयार करण्यात आले आहेत.

6 / 6
थायलंडचे माजी पंतप्रधान थकसिन शिनावात्रा यांनादेखील ब्रास उर्ली भेट म्हणून दिले आहे. ही उर्ली म्हणजे आंध्र प्रदेशातील कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. ही उर्ली वेगवेगळ्या प्रार्थना, सण-उत्सवाच्या काळात वापरली जाते.