Pope Francis Dies : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन

Pope Francis Dies : वॅटिकन सिटीमधून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस 88 वर्षांचे होते.

Pope Francis Dies :  पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन
Pope Francis
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 21, 2025 | 2:05 PM

पोप फ्रान्सिस यांचं वॅटिकन सिटीमध्ये निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वॅटिकन सिटीमधून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस 88 वर्षांचे होते. एकदिवस आधीच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस त्यांना भेटले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जगभरातील 1.4 अब्ज कॅथोलिक शोकसागरात बुडाले आहेत. पोप फ्रान्सिस मागच्या आठवड्याभरापासून ब्रोंकाइटिसने त्रस्त होते. त्यांना 14 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची तब्येत बिघडत गेली.

पोप फ्रान्सिस मागच्या आठवड्यात सेंट पीटर्स स्क्वायर येथे रविवारच्या पारंपारिक प्रार्थनेच आणि कॅथोलिक चर्चमध्ये जयंती वर्ष साजरं करण्याच्या सामूहिक प्रार्थनेच नेतृत्व करु शकले नव्हते. कारण त्यांची तब्येत खराब होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे आधीपासून अनेक ठरलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले. कारण डॉक्टरांनी 88 वर्षाच्या पोप यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. वॅटिकनकडून शनिवारी संध्याकाळी एक अपडेट देण्यात आली. त्यात म्हटलेलं की, दीर्घकाळापासून त्यांना श्वसनाचा त्रास होत आहेच. पण आता त्यांची हालत अजून खराब झाली आहे.


कोणी केली निधनाची घोषणा?

AP च्या रिपोर्ट्नुसार वेटिकनच्या कॅमरलेन्गो कार्डिनल केविन फेरेल यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा केली. कॅमरलेन्गो कार्डिनल हे वॅटिकन सिटीमध्ये एक प्रशासनिक पद आहे. तिजोरीची देखभाल आणि शहराचा प्रशासकीय कारभार संभाळण हे कॅमरलेन्गो कार्डिनलची जबाबदारी असते.