PM Modi In Germany : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत पोहोचले; ‘असा’ असेल मोदींचा तीन दिवसांचा युरोप दौरा

| Updated on: May 02, 2022 | 1:56 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते जर्मनीमध्ये पोहोचले. आज ते जर्मनीचे चांसलर ओलाफ शॉल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत.

PM Modi In Germany : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत पोहोचले; असा असेल मोदींचा तीन दिवसांचा युरोप दौरा
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तीन दिवशीय युरोप दैऱ्यावर आहेत. ते आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज जर्मनीमध्ये पोहोचले. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये (Berlin) त्यांनी जर्मनीत स्थाईक झालेल्या भारतीय नागरिकांशी (Indian Diaspora) संवाद साधला. तेथील भारतीय नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी काही जण तर तब्बल 400 किलोमीटरचा प्रवास करून बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये एका लहान मुलीने त्यांचे छायाचित्र देखील काढले. पंतप्रधान जर्मनीला पोहोचताच त्यांनी भारतीयांशी संवाद साधला. त्यानंतर आज मोदी जर्मनीचे चांसलर ओलाफ शॉल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत. सोबतच मोदी हे तेथील काही उद्योजकांशी देखील संवाद साधणार असून, भारतीयांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवारी डेन्मार्कला भेट देणार

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डेन्मार्कला भेट देणार आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डेन्मार्कला भेट देऊन तेथील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी तेथील नेत्यांसोबत काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोदी मंगळवारी आपला डेन्मार्कचा दौरा आटपून पॅरिसला मुक्काम करणार आहेत. मोदी बुधवारी पॅरीसमध्ये फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भेटून त्यांचे अभिनंदन करणार आहेत. या भेटीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चेचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुलीच्या उत्तराने मोदी भारावले

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनीमध्ये पोहोचले आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी जर्मनीमधील भारतीयांची भेट घेतली. यावेळी एका चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक सुंदर छायाचित्र काढले. हे छायाचित्र मोदींना देखील आवडले. मोदींनी या मुलीशी संवाद साधताना तिला प्रश्न केला तु हे काय बनवले आहे, तेव्हा त्या मुलीने उत्तर दिले मी तुमचे छायाचित्र बनवले आहे. मोदींनी परत तिला एक प्रश्न विचारला तू माझे छायाचित्र का बनवले तेव्हा त्या मुलीने उत्तर दिले की तुम्ही माझे आयकॉन आहात. मुलीच्या या उत्तराने पंतप्रधान देखील भारावून गेले.