पाकिस्तानचा थयथयाट! डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर, अमेरिकेची पलटी..

Prime Minister Narendra Modi on Donald Trump : टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील संवाद जवळपास बंद होता. मात्र, आता परत एकदा दोन्ही देशातील संवाद वाढताना दिसतोय. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध चांगले असल्याचे म्हणत मोठे भाष्य केले.

पाकिस्तानचा थयथयाट! डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर, अमेरिकेची पलटी..
Narendra Modi on Donald Trump
| Updated on: Sep 10, 2025 | 9:03 AM

भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांपासूनचे चांगले संंबंध ताणले आहेत. हेच नाही तर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील मागील काही दिवसांपासून बंद होती. अमेरिकेकडून आरोप करण्यात आला की, व्यापार चर्चेवर आम्हाला भारताकडून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाहीये. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. भारतातून अमेरिकेत जाणारी 70 टक्के निर्यात बंद झालीये. इतका मोठा कर लावण्यात आल्याने भारतीय वस्तूंवरील नफा थेट कमी झाला. याचा परिणाम भारतातील अनेक उद्योगांवर पडला. आता अमेरिकेची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय. पुन्हा एकदा व्यापार चर्चा सुरू होणार आहे आणि त्यातून चांगला मार्ग निघेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार चर्चेबद्दल मोठे भाष्य केले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असून कामय राहतील असेही म्हटले. भारत आणि अमेरिका दोन्ही महान देश असून दोन्ही देशांमध्ये सकारात्मक व्यापार चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट म्हटले. यासोबतच नरेंद्र मोदी यांना मी भेटण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल केलेल्या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, भारत आणि अमेरिका हे खूप जवळचे मित्र आहेत आणि भागीदार देखील. मला नक्कीच विश्वास आहे की, आमचा व्यापार भारत-अमेरिका भागीदारीच्या अफाट क्षमतेला उलगडण्याचा मार्ग मोकळा करेल. आमच्या टीम यावर लवकर काम पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. मी देखील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यास नक्कीच इच्छुक आहे. दोन्ही देशांच्या लोकांसाठी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्र काम करू, असेही मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या विधानाला सकारात्मक प्रतिसाद देताना नरेंद्र मोदी हे दिसले. मागील काही दिवसांपासून रशियाकडून भारत हा तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेकडून टार्गेट केले जात होते. मात्र, आता अमेरिका भारताबद्दल एक पाऊस मागे घेताना दिसत आहे. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर दबाव असताना देखील भारताने रशियाकडून ऑगस्ट महिन्यापेक्षा अधिक तेल सप्टेंबर महिन्यात खरेदी केले.