त्या भेटीला अर्थच नाही? ट्रम्प यांना भेटायला गेलेले पुतीन ड्युप्लिकेट? वाचा सविस्तर…

सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की पुतीन यांच्याऐवजी त्यांच्या ड्युप्लिकेट व्यक्तीने ट्रम्प यांची भेट घेतली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

त्या भेटीला अर्थच नाही? ट्रम्प यांना भेटायला गेलेले पुतीन ड्युप्लिकेट? वाचा सविस्तर...
vladimir-putin
| Updated on: Aug 16, 2025 | 5:35 PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर आता एक वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की पुतीन यांच्याऐवजी त्यांच्या ड्युप्लिकेट व्यक्तीने ट्रम्प यांची भेट घेतली आहे. या दाव्यात काही पुरावेही सादर करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोशन मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यात असं नमूद करण्यात आलं आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांची थेट भेट न घेता, त्यांच्या जागी ड्युप्लिकेट पुतीन यांना पाठवले होते. या दाव्यात असे म्हटले आहे की, पुतीन यांचा चेहरा आणि वागणूक थोडी वेगळी आहे, मात्र ट्रम्प यांना भेटणाऱ्या पुतीन यांचा चेहरा आणि वागणूक वेगळी होती. काही लोकांनी दावा केला आहे की, ट्रम्प यांना भेटणाऱ्या पुतीन यांचे गाल वेगळे होते, तसेच ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान पुतीन हे नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होते त्यामुळे अनेकांनी शंका उपस्थित केली होती.

पुतीन यांच्यासारखे दिसणारे अनेक लोक

अनेकांनी असा दावा केला आहे की, पुतीन सर्व कार्यक्रमांना हजर नसतात. पुतीनसारखे दिसणारे अनेक लोक त्यांच्या जागी सार्वजनिक ठिकाणी जात असतात. एका नेटकऱ्यांने म्हटले की, ‘हे खरे पुतीन नाहीत. रशियाने खऱ्या पुतीनला पाठवले नाही, हा आनंदी पुतीन आहे. हा ड्युप्लिकेट पुतीन लहान सार्वजनिक कार्यक्रमांना जात असतो तसेच तो किमला भेटण्यासाठी उत्तर कोरियाला देखील जातो.’

दावा खरा की खोटा ?

आणखी एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘मला वाटते की हा पुतिनचा बॉडी डबल नंबर 5 आहे. तो पुतिनसारखा अजिबात दिसत नाही. कारण त्याचे गाल गोल आहेत’. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘या पुतीनचे गाल खूप जाड आहेत आणि तो खूप हसतो. तसेच हा नेहमीच हसू थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.’ त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दाव्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा दावा खरा आहे अशी आम्ही पुष्टी करत नाही.