
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटले आहे. दहा दिवसांपेक्षाही अधिक काळ या युद्धाला झाला. मात्र, पुढील काही आठवडे युद्ध सुरू राहणार असल्याचे मोठे संकेत आहेत. मात्र, या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात तेल तुटवडा निर्माण झाला. हॉटेल व्यवसाय धोक्यात आले. इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी अमेरिका-इस्रायली हल्ल्याला इराणच्या प्रतिसादाची चुकीची गणना केली. द न्यू यॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी अमेरिका-इस्रायली हल्ल्याला इराण कसा प्रतिसाद देईल याचा कमी अंदाज लावला होता. त्यांनी इराणला कमी लेखूनच मोठी चूक केली.
त्यांना अजिबातच वाटले नव्हते की, इराण इतक्या मोठ्या ताकदीने इस्त्रायल आणि अमेरिका हल्लाला प्रतिउत्तर देईल. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी इराणला हलक्यात घेतले होते. त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आपण केलेल्या हल्ल्याला इराण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिउत्तर देईल. रिपोर्टनुसार, हल्ल्यापूर्वी ट्रम्प यांनी युद्धामुळे तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो या चिंतेला दुर्लक्षित केले. त्यांना परिस्थिती इतकी भयंकर होईल, हे लक्षात आले नाही आणि त्यांनी दुर्लक्ष केले.
ऊर्जा सचिव क्रिस राईट यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्यांना बाजारपेठेतील अडथळ्यांबद्दल काळजी वाटत नाही. युद्धादरम्यान तेलाच्या किंमतीमध्ये थोडा फार चढउातर अपेक्षित होता. मात्र, इतकी मोठी अस्थिरता येईल, त्यानंतर स्थिर होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही सल्लागारांनी इराण आर्थिक युद्धाचा बदला घेऊ शकतो या शक्यतेवर इशाऱ्याने नकार दिला होता.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाला. हेच नाही तर तेलाचा निर्यात आणि आयातीचा वेगही मंदावला आहे. सध्याची सर्व स्थिती बघता डोनाल्ड ट्रम्प यांना आपली चूक स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी ज्याचा विचार केला नव्हता, त्या गोष्टी घडत आहेत. सिनेटर क्रिस मर्फी यांनी खुलासा केला की, होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पुन्हा उघडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही स्पष्ट योजना नाही. यामुळे आता स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणसोबतचा युद्धाचा निर्णय फसल्याचे बघायला मिळत आहे.