भारतीय वस्तूंचे रशियाच्या बाजारपेठेत स्वागत…डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धक्का, अर्थव्यवस्थेला मोठी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लादल्यानंतर अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आले. हेच नाही तर काहीही झाले तरीही भारत अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारताला कोंडीच पकडण्याचा पूर्ण प्रयत्न देखील झाला.

भारतीय वस्तूंचे रशियाच्या बाजारपेठेत स्वागत...डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धक्का, अर्थव्यवस्थेला मोठी...
donald trump and vladimir putin
| Updated on: Aug 20, 2025 | 2:10 PM

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्यास सांगितले आणि तसा नारा त्यांनी दिला. अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर रशिया हा भारताच्या संपर्कात असून पुतिन यांनी नरेंद्र मोदींना फोन केला. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी बंद करा, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता भारताबद्दल रशियाकडून थेट मोठे विधान करण्यात आले असून भारतासाठी रशिया कशाप्रकारे उभा आहे, हे त्यांनी थेट सांगितले. भारताकडून जास्तात जास्त वस्तू कशा खरेदी करता येतील, यावर रशियचा भर आहे. शिवाय त्यांनी भारताला तेल विक्री बंद करणार नसल्याचेही अगदी स्पष्ट केले.

रशियाने म्हटले की, कोणत्या देशाने भारतीय उत्पादनांवर रोख लावली तर रशियाच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचे स्वागत आहे. रशियाचे मिशन डिप्टी चीफ रोमन बाबूश्किन यांनी म्हटले की, अमेरिकेने अर्थव्यवस्थेला एक शस्त्र बनवले आहे. पण त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, मित्रांवर कधीच बंदी आणली नाही पाहिजे. त्यांनी पुढे म्हटले की, भारत आणि रशियाने कायमच वाईट काळात एकमेकांना साथ दिली आहे. त्यांनी म्हटले, लवकरच पुतिन आणि नरेंद्र मोदी यांची भेट होईल.

या बैठकीत महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. भारत आणि रशियामध्ये व्यापार वाढत आहे. भारताला तेल, गॅस निर्यात करण्यामध्ये रशिया एक नंबरला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेने ज्याप्रकारचा टॅरिफ लावला आहे, त्यांची ही रणनीती ही त्यांच्यावरच भारी पडू शकते. लोकांचा डॉलरवरील भरोसा उडेल. आम्ही तांदूळ, मशिनरी, फार्मा चहा अशा वस्तूंची आयात भारतातून अधिक करणार आहोत. अमेरिकेने भारताबद्दल जो काही टॅरिफचा निर्णय घेतला तो एकतर्फी आणि चुकीचा आहे.

पुतिन हे लवकरच भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. मात्र, तारीख अजून जाहीर करण्यात आली नाहीये. पहिल्यांदाच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफच्या मुद्द्यावर बोलताना रशिया दिसला आहे. हेच नाही तर युक्रेन आणि रशिया युद्धाबाबतही अनेक मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा असणार आहेत.