जगात खळबळ, रशियाने उडवली अमेरिकेची झोप, थेट चीनलाच…
इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असून चर्चेतून मार्ग काही निघत नाहीये. यादरम्यानच अमेरिकेने थेटपणे चीनला मोठी धमकी दिली. चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला. रशियाने अत्यंत मोठा गेम खेळल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मे महिन्यात चीनला भेट देणार होते. मात्र, इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला चीन साथ देत नसल्याने ते नाराज आहेत. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता त्यांनी चीनला मदत मागितली होती. पण चीन काही त्यांच्या मदतीकरिता पुढे आला नाही. उलट चीनकडून इराण आणि आमच्या नात्यात हस्तक्षेप करू नये, असा थेट इशाराच देण्यात आला. नेमक्या याच वेळी इराणसोबतच्या करारावर चर्चा सुरू होती. चीनने या युद्धात भारतासारखेच आपली भूमिका स्पष्ठ ठेवली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन भेटी अगोदरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा गेम खेळल्याचे बघायला मिळत आहे. पुतिन यांनी ट्रम्प यांना धोबीपछाड करण्याकरिता थेट रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना चीनच्या दाैऱ्यावर पाठवत आहेत.
लावरोव्ह हे रशियाचे सर्वात मुरब्बी आणि अनुभवी राजनैतिक मानले जातात. त्यांचा हा चीनचा दाैरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. रशियाच्या न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, लावरोव्ह हे 14 ते 15 एप्रिल रोजी बीजिंगमध्ये असतील. त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर म्हणजेच 14 ते 15 मे रोजी डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दाैऱ्यावर येणार आहेत. म्हणजे हा दाैरा डोनाल्ड ट्रम्प यांचा नियोजित दाैरा आहे.
पण काही दिवसांपूर्वी त्यांनी या दाैऱ्याबद्दल भाष्य करत वेगळेच संकेत दिले जाते. जर चीनने काही गोष्टी ऐकल्या नाही तर दाैरा पुढे ढकलू. डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दाैऱ्यावर जाऊ किंवा नाही पण रशियाने आपला गेम खेळला आहे. ट्रम्प यांनी चीनवर जकातींचा बडगा उगारला आणि त्या धमकीचे पडसाद शांत होण्याआधीच मॉस्कोने घोषणा केली की, सर्गेई लावरोव्ह बीजिंगला जात आहेत.
हा केवळ एक योगायोग असू शकत नाही. ही रशियाची एक अत्यंत विचारपूर्वक केलेली प्रति-चाल आहे. हा नक्कीच मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणावा लागेल. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा दौरा हा वाटाघाटींसाठीचा एक मंच असेल. त्यांनी थेट धमकी दिली की, जर चीनने इराणला शस्त्रे पाठवली, तर ते चिनी वस्तूंवर तब्बल 50 टक्के शुल्क लावतील. या दरम्यानच रशियाने थेट सर्गेई लावरोव्ह यांच्या चीनच्या दाैऱ्याची घोषणा केली.