AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? सुनेत्रा पवारांच्या पक्षातील बड्या नेत्याने मोठा बॉम्ब फोडला

राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेेश पाटील यांनी मोठं भाष्य केलं.

दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? सुनेत्रा पवारांच्या पक्षातील बड्या नेत्याने मोठा बॉम्ब फोडला
sharad pawar Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 7:37 AM
Share

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार हे रुग्णालयात असताना प्रफुल पटेल यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विलीनीकरणावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सुनील तटकरे यांनी देखील अजितदादांनी विलीनीकरणाविषयी सांगितले होते. या दोन्ही घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर उमेश पाटील यांनी मोठं भाष्य केलं.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ‘विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आणि नसतानाही सुरूच होती. विलीनीकरणाबाबत अजितदादा सुनेत्रा वहिनी, जय किंवा पार्थ पवारांना तरी बोलले असते. पण ते कोणालाच बोलले नाही, असं सगळे बोलतात. विलीनीकरण करायचं म्हणजे तुतारी पक्ष घड्याळसोबत येऊन एकत्रित राष्ट्रवादी करायची. मग मोदींचं नेतृत्व त्यांना मान्य होता का? आज मान्य असेल तर मग फुटीची काही गरजच नव्हती. आता अजितदादा गेल्यावर आम्हाला विलिनीकरण मान्य होतंय. आम्ही मोदींसोबत सत्तेत जाणार होतो.  युवती, अल्पसंख्यांक, कामगार विभागाचे, प्रत्येक विभागाचे पदाधिकारी दोन्ही राष्ट्रवादीत आहेत’.

‘दोन्ही राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात निवडणुका लढवल्या. बऱ्याच ठिकाणी जे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भविष्यात त्यांच्या उमेदवारीचं काय, जयंत पाटलांच्या विरोधात निशिकांत पाटील लढले, त्यावेळी 11 हजार मतांनी पराभूत झाले. मग पुढच्या निवडणुकीत त्यांचं काय, या कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा. विलीनीकरण क्लिष्ट विषय असून दोन्ही बाजूनं हे सगळं सोपे नाही. कितीही इच्छा असली तरी. रुपाली ठोंबरे पाटील काय बोलतात, त्याला फारसं महत्व नाही. रुपाली पाटील या आज रोजी पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रांनी शरद पवारांची भेट का घेतली नाही, यावर उमेश पाटील म्हणाले, ‘ सुनेत्रा पवारांचीही तब्येत ठिक नाही. त्यांना व्हायरल इन्फेक्शन आहे. त्यामुळे एक रुग्णाने  दुसऱ्या रुग्णाला भेटायला जाणं योग्य नाही असं मला वाटतं. माझी माहिती की, त्या आजारी आहेत.  शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस, या एकमेव कारणासाठी शरद पवारांना पार्थ पवार भेटायला गेले.  इतरही नेते विचारपूस करायला गेले आहेत.  अशावेळी राजकारणाच्या चर्चा योग्य ठरणार नाही’.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत