Russia Putin : रशियाकडून ‘सरमत’ बद्दल अमेरिका, युरोपाला घाम फोडणारी घोषणा, नुसत्या रेंजचा आकडा ऐकून थरकाप उडेल
Russia Putin : रशियाने त्यांच्या सरमत मिसाइलबद्दल महत्वाची माहिती जाहीर केली आहे. या घोषणा अमेरिका, युरोपियन देशांना घाम फोडणाऱ्या आहेत. रशियाच्या ताफ्यात वेगवेगळ्या रेंजची अनेक मिसाइल्स आहेत.

रशियाकडे वेगवेगळ्या रेंजची मिसाइल्स आहेत. अलीकडेच त्यांनी ‘सरमत’ मिसाइलची यशस्वी चाचणी केली. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे मिसाइल युद्ध ड्युटीवर तैनात करण्याची योजना आहे. या मिसाइलबद्दल व्लादीमीर पुतिन यांनी केलेल्या वक्तव्याने जगातील अनेक देशांचं टेन्शन वाढलं आहे. खासकरुन अमेरिका, युरोपला घाम फोडणारी ही घोषणा आहे. ‘सरमत’मुळे सगळ्या जगातील मिसाइल शक्तीचं संतुलन बिघडू शकतं. सध्या या मिसाइलची रेंज 18 हजार किलोमीटर आहे, जी सर्वात जास्त आहे. पण पुतिन यांच्या म्हणण्यांनुसार, या मिसाइलची रेंज 35 हजार किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.
असं झाल्यास हे जगातील सर्वाधिक रेंजच मिसाइल ठरेल. सरमत मिसाइलच्या यशस्वी चाचणीनंतर पुतिन यांनी पोसायडन आणि बुरवेस्टनिक सिस्टिमवरील काम अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं. त्यांनी ओरेश्निक मिसाइलला अणवस्त्र संपन्न बनवण्याचा उल्लेख केला.
वोयेवोडा मिसाइलपेक्षा वरचढ
स्ट्रेटेजिक मिसाइल फोर्सेजचे कमांडर काराकायेव यांच्या रिपोर्टनुसार सरमतच्या यशस्वी चाचणी नंतर या वर्षाच्या अखेरपर्यंत याची पहिली रेजिमेंट तैनात केली जाऊ शकते. सरमत सिस्टिम याआधीची मिसाइल प्रणाली वोयेवोडा मिसाइल सिस्टिमपेक्षा अनेक बाबतीत वरचढ आहे. मारक क्षमता, थ्रो-वेट आणि मिसाइल भेदण्याची क्षमता याचा या मध्ये समावेश होतो.
Russia’s Sarmat ICBM test was declared a success, with Putin claiming a range exceeding 35,000 km, which would cover any point on Earth via either polar trajectory. Moscow says the missile enters combat duty before year’s end.
The last Sarmat test, in April 2022, ended in a… pic.twitter.com/gl9ApmgVbX
— 🚨Global Alert (@trendingnews911) May 12, 2026
वाढवून-चढवून दावे
पुतिन यांनी रशियाच्या नव्या पिढीच्या अणवस्त्र क्षमतांबद्दल काही वाढवून-चढवून दावे केले आहेत, असं पाश्चिमात्य सुरक्षा विश्लेषकांचं म्हणणं आहे. हा त्यांच्या आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग आहे. ज्याची घोषणा 2018 मध्ये केली होती. सरमत याआधीच्या टेस्ट मध्ये फेल झालं होतं. सरमतची ही रेंज म्हणजे रशियाला जगातील कुठल्याही देशावर हल्ला करता येऊ शकतो.