AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध भडकलं! रशियाचा यु्क्रेनवर भीषण हल्ला, 37 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या कीव प्रांतातील बुचा जिल्ह्यात असलेल्या एका वेअरहाऊसला लक्ष्य केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, रशियाच्या या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे.

युद्ध भडकलं! रशियाचा यु्क्रेनवर भीषण हल्ला, 37 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Russia Attacked on Ukraine Many DiedImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 29, 2026 | 7:38 PM
Share

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू होऊन 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. हे युद्ध आता चौथ्या वर्षात पोहोचले असून संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. अशातच आता रशियाने युक्रेनच्या कीव प्रांतातील बुचा जिल्ह्यात असलेल्या एका वेअरहाऊसला लक्ष्य केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, रशियाच्या या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली आहे.

कीव प्रांताचे गव्हर्नर तिमुर तकाचेंको यांनी शनिवारी टेलिग्रामवर माहिती देताना सांगितले की, ‘दुर्दैवाने बुचा जिल्ह्यातील मृतांची संख्या 37 वर पोहोचली आहे. बचाव पथके आणि संबंधित सर्व यंत्रणा घटनास्थळी काम करत आहेत.’ मृतांमध्ये दिमित्रिव्हस्काचे महापौर तारास डिडिच यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कीवच्या पश्चिम उपनगरांजवळील मायला शहरातील एका गोदामावर रशियन ड्रोनने हल्ला केला. या गोदामात दारुगोळा ठेवण्यात आला होता. हल्ल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झाले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे.

50 निवासी इमारतींचे नुकसान, मोठी आग

स्थानिक प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमुर तकाचेंको यांनी सांगितले की, या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि ती काही घरांसह एका रेस्टॉरंटपर्यंत पसरली. अल जझीराच्या वृत्तानुसार, वेअरहाऊसमध्ये स्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती. या प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात येत आहे. कंपनीच्या परिसरात स्फोटक वस्तू आणि सामग्री साठवण्याची परवानगी होती का, तसेच संबंधित कंपनीकडे आवश्यक परवाने आणि मंजुरी होती का, याचीही चौकशी केली जाणार आहे.

निवासी भागाजवळ दारुगोळा ठेवण्यास मनाई

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही मायला गावातील वेअरहाऊसवर हल्ला झाल्याची पुष्टी केली. हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. झेलेन्स्की म्हणाले की, नियम स्पष्ट आहेत, घरे किंवा इतर निवासी भागांच्या जवळ दारुगोळा ठेवता येत नाही.

42 जण जखमी

कीव प्रांताच्या गव्हर्नरने टेलिग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 42 जण जखमी झाले आहेत. तसेच बुचा जिल्ह्यातील हल्लाग्रस्त ठिकाणाहून 380 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान सर्गी कोरेत्स्की यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...