Russia Ukraine War Video: मेड बाय रशिया, आगीच्या ज्वाळा, धगधगणाऱ्या इमारती, यूक्रेनचा कणा मोडतोय?

मागच्या सात दिवसांपासून तिथं युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या सैनिकांकडून देखील रशियाला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. त्यामध्ये रशियाच्या अनेक सैनिकांचाा मृत्यू झाल्याचा देखील दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

Russia Ukraine War Video: मेड बाय रशिया, आगीच्या ज्वाळा, धगधगणाऱ्या इमारती, यूक्रेनचा कणा मोडतोय?
हल्ल्यात जळत असलेली इमारत
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 02, 2022 | 2:51 PM

मागच्या सात दिवसांपासून रशियाने (Russia) युक्रेनच्या (Ukraine) अनेक शहरांवरती आक्रमण केल्याचं पाहतोय, परंतु काल रात्रीपासून हल्ल्याची तीव्रता वाढली असून कीव आणि खार कीव या प्रमुख शहारातील अनेक महत्त्वाच्या इमारती पोलिसांनी उद्ववस्त केल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती किती चिघळली आहे याचा अंदाज येतोय. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध (war) थांबावं यासाठी अनेक देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच अनेक देशातील नागरिकांनी रशियाच्या विरोधात निदर्शने देखील केली आहेत. त्यामुळे हे युद्ध कधी थांबतंय असं अनेकांना वाटतंय.

सरकारी कार्यालय उद्वस्त

रशियाने सुरूवातीला केलेल्या युद्धात युक्रेनचं अधिक नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच युक्रेनच्या लष्करीसाठ्यावरती रशियाने जोरदार हल्ला केला. त्यानंतर युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरात सरकारी कार्यालयावरती सुध्दा हल्ला केला असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. युक्रेनच्या अनेक शहरात जोरदार बॉम्ब हल्ला सुरू असून तिथली लोक अत्यंत भयभीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी युक्रेन देश सोडला. तसेच अनेक सामान्य नागरिक युक्रेनमध्ये अडकल्याने भीती खाली जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत युक्रेनमध्ये अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिथं लोकांच्यामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

युक्रेनमधली सध्याची स्थिती

मागच्या सात दिवसांपासून तिथं युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या सैनिकांकडून देखील रशियाला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. त्यामध्ये रशियाच्या अनेक सैनिकांचाा मृत्यू झाल्याचा देखील दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत बॉम्ब हल्ला केल्याने तिथं अनेक सैनिकांसह सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी असलेल्या अनेक नागरिकांनी तिथून आपला देश गाठला आहे. रस्त्यावर फक्त तिथे अग्नीच्या लाटा, आकाशात धूर आणि उद्ववस्त झालेल्या इमारती असं सगळं चित्र आहे. दोन्ही देशांकडून प्रतिकार सुरू असल्याने तिथं भयभीत झालेले नागरिक मदतीचे आवाहन करीत आहेत. तिथली अनेक उदाहरण सध्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समजतं आहेत.

Russia Ukraine War Live : सहा दिवसांमध्ये सहा हजार रशियन सैनिकांचा खात्मा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

Video: ना प्रसुतीगृह सोडलं ना पोलीस हेडक्वार्टर्स, रशियाच्या बाँब हल्ल्यात मजबूत इमारतीही जमीनदोस्त

Nuclear War: अर्ध्या तासात 10 करोड लोकांचा मृत्यू, जाणून घ्या आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं ?