Russia Ukraine War Live : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख, पाहा शहरांची अवस्था

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Mar 02, 2022 | 11:56 PM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख, पाहा शहरांची अवस्था
Russia Ukraine War विध्वंसक वळणावर
Image Credit source: PTI

शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga)नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. युद्ध सुरू असल्यामुळे युक्रेनच्या हद्दीत विमान उड्डाणास बंदी आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने मोल्दोव्हासोबत बोलणी सुरू आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना आता मोल्दोव्हाच्या सीमा देखील खुल्या करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मोल्दोव्हा आणि बुखारेस्टमार्गे भारतात आणले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या जेवनाची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Mar 2022 11:13 PM (IST)

  रशियाविरोधात निंदा प्रस्ताव

  युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान आज यूएनजीएने रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त 5 मते पडली. त्याच वेळी, 35 देशांनी यात भाग घेतला नाही.

 • 02 Mar 2022 10:44 PM (IST)

  मॉस्कोचा मोठा दावा

 • 02 Mar 2022 10:04 PM (IST)

  रशियन हल्ल्यात युक्रेनची अनेक शहरं बेचिराख

  रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या दरम्यान, डोनेस्तक प्रदेशातील होर्लिव्हका आणि यासिनुवाता येथील निवासी भागात बॉम्ब आणि गोळीबाराने केलेले नुकसान

 • 02 Mar 2022 09:15 PM (IST)

  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान दिल्लीत पोहोचले, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

  A special flight carrying Indian nationals stranded in Ukraine reached Delhi, Union Minister G Kishan Reddy welcomed them at the airport #OperationGanga pic.twitter.com/UY7awHYSiv

  — ANI (@ANI) March 2, 2022

 • 02 Mar 2022 08:28 PM (IST)

  17 हजार लोकांनी युक्रेन सोडल्याचा अंदाज-MEA

  युक्रेन सोडून जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आमचा अंदाज आहे की आमचा सल्ला जारी झाल्यापासून जवळपास 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्या आहेत: अरिंदम बागची, MEA प्रवक्ते

  रशियाने दिलेल्या अलर्टनंतर खारकीव सोडण्याचे आवाहन

 • 02 Mar 2022 08:24 PM (IST)

  मोदींची आजही युक्रेनवर बैठक

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता युक्रेन मुद्द्यावर एका उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

 • 02 Mar 2022 08:22 PM (IST)

  भारतीयांना मोठा दिलासा

  सुमारे 800 भारतीयांसह चार विमानं आज रात्री 1.30 ते उद्या सकाळी 8 च्या दरम्यान हिंडन एअरबेसवर उतरतील: सरकारी अधिकारी

 • 02 Mar 2022 07:38 PM (IST)

  पुतिन यांना 3 दिवसात युक्रेन जिंकायचे होते - रशियन सैनिक

  युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियन सैनिकाचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेन 3 दिवसात जिंकायचे होते. दरम्यान, युक्रेनच्या लोकांनी रशियन सैनिकाला मदत केली आणि कुटुंबीयांनाही बोलायला लावल्याची बातमी आहे. युक्रेनियन लोकांनी रशियन सैनिकाला चहा आणि जेवण दिले.

 • 02 Mar 2022 05:55 PM (IST)

  भारतीय नागरिकांनी तात्काळ खार्किव सोडावे

  युक्रेनमधील खार्किव येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक नवीन अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तातडीने शहर सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे..

 • 02 Mar 2022 05:54 PM (IST)

  ऑपरेशन गंगाची गती वाढली

 • 02 Mar 2022 04:46 PM (IST)

  रशिया अध्यक्ष झेलेन्स्की यांना हटवण्याच्या तयारीत

  रशिया युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना हटवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांचे जवळचे मित्र व्हिक्टर यानुकोविच हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनवायचे आहेत. व्हिक्टर यानुकोविच बेलारूसमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 • 02 Mar 2022 04:18 PM (IST)

  युक्रेन रशिया युद्धाचा भारतावर मोठा परिणाम, क्रूड ऑइलच्या किमती प्रचंड वाढल्या

  युक्रेन रशिया युद्धाचा भारतावर मोठा परिणाम

  क्रूड ऑइलच्या किमती प्रचंड वाढल्या

  भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम

  दोन्ही देशांमधून आयात होणाऱ्या वस्तू बंद होणार

  अर्थतज्ज्ञांच्या मते देशात महागाई उच्चांक गाठणार

 • 02 Mar 2022 04:18 PM (IST)

  रशिया- युक्रेनच्या युद्धाची झळ आपल्यालाही बसण्यास सुरुवात

  रशिया- युक्रेनच्या युद्धाची झळ आपल्यालाही बसण्यास सुरुवात...

  खाद्यतेल भाव वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले..

  खाद्यतेलाचे भाव भडकले, चार दिवसांत २० रुपये पेक्षा जास्त वाढ...

  रोजचे जेवण महागणार...

 • 02 Mar 2022 03:46 PM (IST)

  तिसरे महायुद्ध हे अणवस्त्र युद्द असेल, पुतीनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

 • 02 Mar 2022 03:44 PM (IST)

  सरेंडर करा अन्यथा Konotop शहरावर हल्ला करु, रशियानं धमकी दिल्याचा आरोप

  सरेंडर करा अन्यथा Konotop शहरावर हल्ला करु आणि बर्बाद करु, अशी धमकी रशियानं दिल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केला आहे.

 • 02 Mar 2022 02:48 PM (IST)

  युक्रेन सैन्याच्या दाव्यानुसार रशियाचे नुकसान

 • 02 Mar 2022 01:22 PM (IST)

  सहा दिवसांमध्ये सहा हजार रशियन सैनिकांचा खात्मा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान आतापर्यंत रशियाचे सहा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलन्स्कि यांनी केला आहे. याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

 • 02 Mar 2022 12:26 PM (IST)

  'हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत'

  गेल्या आठवड्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना काढण्यासाठी ऑपरेशन गंगातंर्गत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सध्या जे घडते आहे ते सर्व अनिश्चित असून, भयानक असे आहे. आम्ही युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. ज्या विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे भारतातील डच राजदूत मार्टेन बर्ग यांनी म्हटले आहे.

 • 02 Mar 2022 11:55 AM (IST)

  खारकीव मेडीकल सेंटरवर एअरस्ट्राईक

  खारकीव मेडीकल सेंटरवर एअरस्ट्राईक

  रशियन आर्मीकडून एअर स्ट्राईक

  एअर स्ट्राईकमध्ये मेडीकल सेंटरचे मोठे नुकसान

 • 02 Mar 2022 11:22 AM (IST)

  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला

 • 02 Mar 2022 09:50 AM (IST)

  युक्रेनचे रशियाला चोख प्रत्युत्तर, रशियन सैन्याच्या ताफ्यावर हल्ला

  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. युक्रेनच्या एका शहरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याच्या ताफ्यावर युक्रेन सैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाचे अनेक सैनिक गंभीर जखमी झाल्यचे वृत्त समोर येत आहे. रशियाकडून युक्रेनच्या कीव आणि खारिकव या दोन शहरांना लक्ष करण्यात येत आहे.

 • 02 Mar 2022 08:32 AM (IST)

  युक्रेनियन धैर्याने लढत आहेत - बायडन

  स्टेट ऑफ द युनियनच्या भाषणादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे कौतुक केले आहे. युक्रेनियन नागरिक मोठ्या धैर्याने आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसचे येणाऱ्या काळात रशियाला याची मोठी किंमत चुकावी लागणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

 • 02 Mar 2022 08:27 AM (IST)

  अमेरिका युद्धात सहभागी होणार नाही - बायडन

  अमेरिकेने रशियासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. अमेरिका युक्रेनच्या पाठीमागे ठाम उभा आहे. नाटो देशांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. येणाऱ्या काळात देखील निर्बंध घालणार आहोत. मात्र आम्ही युद्धात सहभागी होणार नसल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.

 • 02 Mar 2022 08:20 AM (IST)

  पुतीन कधीच युक्रेनियन नागरिकांचे मने जिंकू शकत नाहीत - बायडन

  रशिया युक्रेनवर हल्ला करू शकते, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन रणगाड्यांच्या जोरावर युक्रेन जिंकू शकतात. मात्र ते तेथील लोकांचे मने कधीही जिंकू शकणार नाहीत. पुतीन यांना युक्रेनियन नागरिकांचे कधीही समर्थ मिळणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे.

 • 02 Mar 2022 08:12 AM (IST)

  गेल्या वर्षी अमेरिकेत 6.5 कोटी नवे रोजगार - बायडन

  कोरोच्या संकटातही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ चांगली राहिली. गेल्या वर्षी अमेरिकेत तब्बल सहा कोटी पन्नास लाख नवे रोजगार उपलब्ध केले - बायडन

 • 02 Mar 2022 08:04 AM (IST)

  रशियन विमान उड्डाणांसाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद करणार - बायडन

  नाटोकडून लवकरच एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल, जी युरोपीयन देशामध्ये असलेली रशियाची मालमत्ता जप्त करेल, तसेच रशियन विमान उड्डाणांसाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जो बायडन यांनी दिला आहे.

 • 02 Mar 2022 07:59 AM (IST)

  रशियाला दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील - बायडन

  अमेरिका आणि आमचे सहयोगी देश 'नाटो' युक्रेनच्या भूभागाचे रक्षण करतील. युक्रेन मोठ्या हिमतीने रशियाला तोंड देत आहे. रशियाला कदाचित आज युद्धभूमीवर विजय मिळू शकतो. मात्र याचे दीर्घकालीन परिणाम रशियाला भोगावे लागतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे.

 • 02 Mar 2022 07:52 AM (IST)

  रशियाला युक्रेनवरील हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल - बायडन

  गेल्या आठवडाभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहे. आता या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून रशियाला निर्वानीचा इशारा देण्यात आला आहे.  अमेरिका युक्रेनसोबत आहे. रशियाला या हल्ल्यांची किंमत चुकवावी लागेल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे.

 • 02 Mar 2022 07:20 AM (IST)

  ज्योतिरादित्य शिंदे रोमानियात

  हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियात पोहोचलेत. ऑपरेशन गंगानं आता गती पकडलीय. यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं जातंय त्याला ऑपरेशन गंगा नाव देण्यात आलंय. त्याच अंतर्गत शिंदे हे रोमानियात आहेत. त्यांनी भारताच्या राजदुतांसोबत एअरपोर्टवरच मिटींग केली.

 • 02 Mar 2022 07:13 AM (IST)

  बोईंगनेही रशियाची मदत रोखली

 • 02 Mar 2022 07:10 AM (IST)

  अॅपलनं सर्व प्रोडक्ट रोखले

  रशियात विक्री होणारे सर्व प्रोडक्ट तात्पुरते रोखल्याचं अॅपल कंपनीनं म्हटलंय. रशियाच्याविरोधात अमेरीका, यूरोपनं जे आर्थिक निर्बंध लादलेत, त्याचाच हा एक भाग आहे.

 • 02 Mar 2022 07:05 AM (IST)

  रोमानियासाठी सी-17 विमान रवाना

  भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियातून परत आणण्यासाठी इंडियन एअरफोर्सचं सी -17 एअरक्राफ्ट रवाना झालंय. हिंडन एअरबेसवरुन विमान रवाना. पहाटे विमानानं उड्डान भरलं.

 • 02 Mar 2022 06:36 AM (IST)

  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध चालू आहे. अमेरिकेने वारंवार इशारा देऊन देखील रशियाने युक्रेनवरील हल्ले चालूनच ठेवले आहेत. त्यामुळे आता रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर अमेरिका रशियन विमानांना आपल्या हद्दीत प्रवेश बंदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Published On - Mar 02,2022 6:20 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI