
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दाैऱ्यावर होते. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पुतिन यांनी भारत दाैरा केला. विशेष म्हणजे भारतानेही पुतिन यांचे धडाक्यात स्वागत केले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. यादरम्यान रशिया आणि भारतात अनेक महत्वाचे करार झाले. पुतिन रशियाचे डझनभर मंत्री आपल्या या दाैऱ्यात घेऊन आले होते. यावेळी संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर होत्या. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव होता. विशेष म्हणजे भारत आणि रशियात ऊर्जेचेही काही करार झाले. भारत दाैऱ्यानंतर पुतिन भारताच्या दुश्मन देशाच्या दाैऱ्यावर गेल्याने एकच खळबळ उडाली. व्लादिमीर पुतिन तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यावर गेले आणि अनेक करारांवर सह्या केल्या. यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुतिन यांची भेट घेण्यासाठी चांगलीच धडपड केली.
व्लादिमीर पुतिन यांची कडक सुरक्षा असते. व्लादिमीर पुतिन यांच्या दाैऱ्याबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. हेच नाही तर ज्यावेळी व्लादिमीर पुतिन यांचे विमान आकाशात असते, त्यावेळी सेम काही विमाने देखील त्यावेळीच आकाशात असतात. व्लादिमीर पुतिन नेमके कोणत्या विमानात आहेत हे देखील कळू दिले जात नाही. पुतिन यांचा एक एक इशारा खूप जास्त महत्वाचा असतो. सध्या व्लादिमीर पुतिन यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.
व्लादिमीर पुतिन यांचा तो व्हिडीओ बघितल्यावर त्यांच्यावर काैतुकांचा वर्षाव होत आहे. तसा पुतिन यांचा तो व्हिडीओ जुना आहे. मध्य आशिया राजनैतिक भेटीदरम्यान एक व्यक्ती पुतिन यांच्यासमोर कुत्र्याच्या पिल्लूला चुकीच्या पद्धतीने उचलत होता. मात्र, हे पाहून पुतिन स्वत: रोखू शकले नाही. पुतिन सर्वकाही विसरून लगेचच खुर्चीवरून उतरले आणि अलगत त्या पिल्लाला हातात घेतले.
यावेळी त्यांनी अत्यंत प्रेमाने त्याला घेतले. फक्त घेतलेच नाही तर त्याची किसही घेतली आणि त्याला सोडून दिले. तो व्यक्ती ज्याप्रकारे कुत्र्याचे पिल्लू हातात पकडत होता, ते पुतिन यांना अजिबात आवडले नाही. हा व्हिडीओ पाहून लोकांनी व्लादिमीर पुतिन यांचे काैतुक केले असून उगाच लोक मोठे होत नसल्याचे त्यांनी म्हटले. व्लादिमीर पुतिन यांना प्राण्यांवर खूप जास्त प्रेम आहे.