व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने भारताला धक्का, थेट दोन शत्रू देशांना जवळ करत पाकिस्तानच्या…
व्लादिमीर पुतिन भारताच्या दोन दिवसीय दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान भारत आणि रशियात अत्यंत महत्वाचे करार झाले. संपूर्ण जगाच्या नजरा या दाैऱ्याकडे होता. मात्र, आता पुतिन यांनी अत्यंत मोठा धक्का दिल्याचे बघायला मिळतंय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आठ दिवसांपूर्वीच भारत दाैऱ्यावर होते. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. काही महत्वाचे करार दोन दिवसाच्या दाैऱ्यावर आल्यानंतर पुतिन यांनी केले. पुतिन भारतासोबत करार करण्यासाठी मंत्र्यांचा मोठा फाैजफाटा घेऊन आले होते. अमेरिकेच्या नाकावर टिचून अनेक करार भारत आणि रशियाने केले. भारत आणि रशियातील तणाव वाढवण्यासाठी अमेरिकेकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न केली जात आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ रशियाने लावला. मात्र, अमेरिकेने इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. चीन रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. फक्त धमकी दिली. यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका जगाने बघितली.
आता रशियाकडून भारताच्या दोन दुश्मन देशांसोबत जवळीकता वाढवली जात आहे. पुतिन तुर्कमेनिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगात तुर्कस्तानला भारताचा शत्रू देश मानले जाते. भारत आणि पाकिस्तानच्या तणावात तुर्कीनेही थेट भारताच्या विरोधात भूमिका घेतल्याचे संपूर्ण जगाने बघितले. त्यामध्येच पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, व्लादिमीर पुतिन तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यादरम्यान अनेक करारांवर सह्या करतील. गेल्या 15 दिवसांतील पुतिन यांचा हा तिसरा मोठा दौरा आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी भारताला भेट दिली होती. त्यापूर्वी ते किर्गिस्तानला गेले होते. तुर्कमेनिस्तानला रशियाचा जवळचा मित्र मानले जाते. तुर्कमेनिस्तान कॅस्पियन समुद्राशी संबंधित एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्या कार्यक्रमात पुतिन सहभागी झाले.
पुतिन हे तुर्कमेनिस्तानसोबत डिजिटल विकास, विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत करार करतील. रशिया आणि तुर्कमेनिस्तानमधील वार्षिक व्यापार 1.6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन यांच्या दाैऱ्यादरम्यान तिथे पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ भेटू शकतात. भारतात पुतिन दोन दिवसीय दाैऱ्यावर आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट बघायला मिळाला. त्यामध्येच आता थेट शहबाज पुतिन यांना भेटणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. पुतिन यांच्या मनात नक्की काय आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
