पुतिन यांच्या भारत भेटीनंतर ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांचा तो धक्कादायक निर्णय, थेट..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सध्या चांगलाच थयथयाट बघायला मिळतोय. डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक हैराण करणारी निर्णय घेत आहेत. पुतिन यांच्या भारत भेटीनंतर त्यांचा संताप बघायला मिळाला. भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे सरकत नाहीये.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत, रशिया आणि चीन यांची जवळीकता वाढल्याने चिंतेत आहेत. अशावेळी तिन्ही देशांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केली जात आहेत. व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला. अगोदरच त्यांनी H-1B व्हिसावर 88 लाख शुल्क आकारले. अमेरिकेत भारत आणि चीनच्या लोकांना येण्यापासून रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्टर प्लॅन तयार केला. अमेरिकेतील परदेशी प्रतिभेला प्रतिबंधित करण्याचा संघर्ष एका नवीन वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ट्रम्प गोल्ड कार्ड लाँच केले. या कार्डची किंमत $1 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 89.7 दशलक्ष रुपये आहे. मात्र, कंपन्यांना $2 दशलक्ष द्यावे लागतील. विशेष: भारत आणि चीनमधून येणाऱ्या लोकांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी ते विविध प्रयत्न करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड व्हिसा कार्यक्रम सुरू केला. त्याची किंमत 44 कोटी आहे. सप्टेंबरमध्ये ही रक्कम कमी करून 1 दशलक्ष डॉलर्स करण्यात आली. ट्रम्प म्हणाले की, हा त्यांच्या अमेरिका फर्स्ट अजेंडाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश उच्च प्रतिभेला उदाहरणार्थ भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणे आहे. हेच नाही तर विविध कंपन्यांना अमेरिकेत आणणे. दिवसेंदिवस डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांसाठी शुल्क वाढवताना दिसत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प अगदी लवकरच प्लॅटिनम कार्ड लाँच करू शकतात. त्याची किंमत अंदाजे 42 कोटी रुपये आहे. अमेरिकेच्या गोल्ड कार्डची अनेक फायदे आहेत. नागरिकांना केवळ पासपोर्ट आणि मतदानाचा अधिकारच देत नाही तर अमेरिकन नागरिकाचे इतर सर्व फायदे देखील मिळतात. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हा जो व्हिसा कार्यक्रम आहे तो परदेशी श्रीमंत लोकांसाठी आहे. 1 दशलक्ष डॉलर्स देऊन अमेरिकेत ते राहू आणि कामही करू शकतील.
अमेरिकेच्या धोरणावरून हे स्पष्ट होत आहे की, जर तुम्हाला अमेरिकेत यायचे असेल तर या.. पण त्याकरिता तुम्हाला मोठा पैसा मोजावा लागेल. ते म्हणाले की अमेरिका आता फक्त प्रतिभावान व्यक्तींनाच व्हिसा देईल. अमेरिकेतील फक्त नोकऱ्या घेऊ शकणाऱ्यांना नाही. त्यांनी म्हटले की, या पैशाचा वापर कर कमी करण्यासाठी आणि सरकारी कर्ज फेडण्यासाठी केला जाईल.
