
इस्रायलचा शेजारी असलेल्या सौदी अरेबियाने बेंजामिन नेतन्याहू सरकारसोबत मोठा गेम केलाय. इस्रायल इथे युद्ध लढण्यात व्यस्त असताना सौदीने मोठी खेळी केली. हा इस्रायलच्या बेंजामिन नेतन्याहू सरकारसाठी मोठा झटका आहे. कारण युरोपमधल्या एका शक्तीशाली देशाची भूमिका बदलल्याचे हे संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात या देशाचा प्रभाव आहे. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. म्हणून इस्रायलसाठी हा मोठा झटका ठरतो. फ्रान्सने पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे संकेत दिलेत. यामागे सौदीची रणनिती आहे. फ्रान्सने नेतन्याहू आणि अमेरिकेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन पॅलेस्टाइनला वेगळा देश म्हणून मान्यता देण्याचे संकेत दिलेत. सौदी अरेबियाच्या प्रयत्नांचा हा रिझल्ट आहे.
अल अरबियानुसार, या प्रयत्नासाठी पॅलेस्टाइन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष हुसैन अल शेख यांनी सौदीचे आभार मानलेत. अल शेख म्हणाले की, सौदीनेच जगाला दोन राष्ट्रांचा फॉर्म्युला सुचवला. त्यामुळेच पॅलेस्टाइनला फ्रान्सने मान्यता दिलीय. रिपोर्ट्नुसार पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यासाठी सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सने राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांच्यासोबत चर्चा केलेली. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना डिटेलमध्ये समजावलं की, पॅलेस्टाइन मान्यता दिल्यास कसं युद्ध थांबू शकतं.
क्राऊन प्रिन्सने काय सांगितलं?
क्राऊन प्रिन्सने यासाठी जून 2025 मध्ये अभियान चालवलेलं. सौदी अरेबियाच म्हणणं आहे की, 1967 च्या सीमांवरच हा विवाद संपू शकतो. यात पूर्व जेरुसलेमला पॅलेस्टाइनची राजधानी म्हणून मान्यता दिली पाहिजे. पूर्व जेरुसलेम इस्रायलच्या ताब्यात आहे. दोन राष्ट्राच्या सिद्धांतावरुन आयोजित होणाऱ्या शिखर सम्मेलनाचा सौदी प्रमुख आहे. याच महिन्याच्या अखेरीस अमेरिकेत न्यू यॉर्क येथे या संदर्भात बैठक होणार आहे. आपला प्रस्ताव ब्रिटन सारख्या देशाच्या गळी उतरवणं हा सौदी अरेबियाचा प्रयत्न असेल.
पॅलेस्टाइनला याचा थेट फायदा काय?
फ्रान्सने पॅलेस्टाइनला मान्यता देणं हा थेट इस्रायलसाठी मोठा झटका आहे. याची दोन मुख्य कारणं आहेत. पॅलेस्टाइन एक स्वतंत्र देश बनेल. त्यांच्याकडे स्वत:च सैन्य असेल. आतापर्यंत पॅलेस्टाइनकडे अधिकृतपणे सैन्य बाळगण्याचा अधिकार नाहीय. हमास पॅलेस्टाइनची प्रॉक्सी संघटना आहे. जगातील अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानतात.
बफर झोन म्हणून घोषित
इस्रायलने गाजा आणि वेस्ट बँकच्या अनेक भागांना बफर झोन म्हणून घोषित केलय. पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळताच ही क्षेत्र पुन्हा त्यांच्या ताब्यात जातील. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यानुसार इराण पुन्हा इथे सक्रीय होईल आणि इस्रायलमध्ये दहशतवाद पसरवणार.