मासे, केक आणि रोज थोडेसे मद्य, नो स्मोकिंग; महाराणींच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य जाणून घ्या!

| Updated on: Sep 11, 2022 | 11:29 AM

शिवाय त्या सतत कामात बिझी असायच्या. त्या दरवर्षी डझनभर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. तसेच रोज राज्याशी संबंधित प्रकरणात त्या स्वत: लक्ष घालायच्या. त्याच कामात त्या नेहमी व्यस्त असायच्या.

मासे, केक आणि रोज थोडेसे मद्य, नो स्मोकिंग; महाराणींच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य जाणून घ्या!
महाराणींच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य जाणून घ्या!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लंडन: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. त्या ग्रेट ब्रिटनमधील (London) सर्वात दीर्घायू आणि सर्वाधिक काळ गादी सांभाळणाऱ्या महाराणी होत्या. शाही पॅलेसने त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट केलं नाही. मात्र, महाराणी यांच्या दीर्घ आयुष्याचं सिक्रेट जगजाहीर झालं आहे. महाराणी जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक होत्या. पण असं असलं तरी त्यांनी आपली लाईफस्टाईल अत्यंत साधारण ठेवली होती. कोणताही बडेजाव त्यांनी ठेवला नव्हता. त्यांच्या या साध्या राहणीतच त्यांच्या दीर्घ आयुष्याचं गुपित असल्याचं सांगितलं जात आहे. डाएट, एक्सरसाईज, पुरेशी झोप याबाबत त्यांनी जिवंत असताना कधीच काही सांगितलं नाही. मात्र, त्यांचं एकूण वय पाहता त्यांची लाईफस्टाईल (lifestyle) अत्यंत चांगली होती आणि त्या स्वत:ची नीट काळजी घ्यायच्या हे दिसून येत आहे.

Webmedने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या डाएटविषयीची माहिती दिली आहे. शाही शेफ डेरेन मॅकग्राडी यांनी 2017मध्ये सीएनएला माहिती देताना महाराणींच्या लाईफस्टाईलवर प्रकाश टाकला होता. महाराणी सकाळी अर्ल ग्रे चहा घ्यायच्या. त्यानंतर त्या नाश्त्यात दही घ्यायच्या. कधी कधी टोस्ट आणि जामही घ्यायच्या. एखाद्या फंक्शनमध्ये जेवायचं नसेल तर त्या दुपारी आणि रात्री जेवणात केवळ शिजवलेले ग्रील्ड नॉनवेज घ्यायच्या. दुपारच्या जेवणात त्या मासे, तीतर किंवा हरिण खायच्या. रात्रीच्या जेवणात फॅट नसलेले मासे घ्यायच्या. त्यांची डाएट नेहमीच क्लीन होती. त्यांना जे खायचं ते त्या खात होत्या. त्या नेहमी हेल्दी जेवण घ्यायच्या. कधी कधी त्या दुपारी आणि रात्रीच्या जेवणात फिंगर सँडविच आणि केकसोबत चहा घेत असायच्या. त्या रोज मद्यही घ्यायच्या असं सांगितलं जातं.

नो एक्सरसाईज

महाराणी कोणतीही स्पेशल एक्सरसाईज करत नव्हत्या. त्या आपल्या डेली रुटीनमध्येच फिजिकल अॅक्टिव्हिटीचा समावेश करायच्या. त्यामुळे त्या सदैव अॅक्टिव्ह राहायच्या. वेळ मिळताच त्या आपल्या श्वानांसोबत फिरायच्या. घोडेस्वारी करायच्या. त्याशिवाय त्या पुरेशी झोपही घ्यायच्या. त्या रात्री 11 वाजण्यापूर्वीच झोपी जायच्या. तसेच सकाळी 7.30 वाजता उठायच्या.

हे सुद्धा वाचा

दानधर्मात अग्रेसर

शिवाय त्या सतत कामात बिझी असायच्या. त्या दरवर्षी डझनभर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. तसेच रोज राज्याशी संबंधित प्रकरणात त्या स्वत: लक्ष घालायच्या. त्याच कामात त्या नेहमी व्यस्त असायच्या. त्यांनी राजगादी सांभाळल्यापासून दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला. त्या गरजवंतांच्या मदतीलाही धावून जायच्या.

धूम्रपान नाही

महाराणींचे वडील, काका, आजोबा, पणजोबा आणि बहीण यांचा मृत्यू धूम्रपानामुळे झाला होता. त्यामुळे त्यांनी कधी आयुष्यात स्मोकिंग केलं नाही. कोरोना काळात त्यांना कोरोना झाला होता. गेल्या वीस वर्षात केवळ तीन वेळाच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती.