
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध संपवण्यासाठी शांततेचा एक प्रस्ताव मांडलेला आहे. त्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू राजी झालेले आहेत. ट्रम्प यांच्या प्रस्तावानुसार इस्रायलला गाजामध्ये सैन्य कारवाई थांबवावी लागेल. हमासला जिवंत आणि मृत बंधकांना टप्याटप्याने परत करावं लागेल. त्यांना शस्त्र खाली ठेवावी लागतील. प्रस्तावावर दोन्ही पक्षांची सहमती झाल्यानंतर गाझामध्ये मानवी सहाय्यता बहाल करण्यावरील निर्बंध हटवता येतील. या 20 सुत्री गाझा प्लानमुळे पॅलेस्टाइन राष्ट्र निर्मिताचा मार्ग उघडला जाईल.
ट्रम्प यांनी नेतन्याहूंसोबत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गाझा प्लान सादर केला. यावेळी त्यांनी नुकतेच खास बनलेले पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा उल्लेख केला. “पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फिल्ड मार्शल सुरुवातीपासूनच आमच्या सोबत होते. ते खूप शानदार आहेत. त्यांनी स्टेटमेंट दिलय की ते या प्लानमध्ये आमच्यासोबत आहेत. त्यांनी पूर्णपणे या प्लानच समर्थन केलय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
इस्रायलला अजून पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मिडिया साइट एक्सवर एक टि्वट केलं. त्यांनी ट्रम्प यांच्या गाझा प्लानच समर्थन केलं. पाकिस्तानने इस्रायलला अजूनपर्यंत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. गाझामध्ये इस्रायली हल्ल्याला नरसंहार म्हटलय.
पाकिस्तानात खूप टीका
शहबाज शरीफ किंवा पाकिस्तानचे मंत्री आतापर्यंत इस्रायलसाठी ‘जायोनिस्ट रिजीम’ या शब्दाचा वापर करायचे. जायोनिस्ट रिजीम म्हणजे इस्रायलला एक देश म्हणून कधीच मान्यता देणार नाही असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं होतं. आता ते टू स्टेट सॉल्यूशन बद्दल बोलत आहेत. याचा अर्थ पाकिस्तान इस्रायलला मान्यता द्यायला तयार आहे. शहबाज शरीफ यांच्या या बदलेल्या भूमिकेवर पाकिस्तानात खूप टीका होत आहे.
We categorically reject the Prime Minister’s statement. The United Nations Charter is clear: every nation has the right to armed struggle if its land is occupied, and no power can forcibly deny this right. To praise any so-called peace proposal built upon the bodies of 66,000… https://t.co/EYtoil0uHv
— Naeem ur Rehman (@NaeemRehmanEngr) September 29, 2025
हे गुन्हेगारांना साथ देण्यासारखं
नईम उर रहमानी नावाच्या एक वेरिफाइड पाकिस्तानी यूजरने शहबाज शरीफवर टीका करताना लिहिलय की, “आम्ही पंतप्रधानांच वक्तव्य फेटाळून लावतो. संयुक्त राष्ट्राच्या चार्टरमध्ये स्पष्टपणे म्हटलय की, कुठल्या देशाची जमीन ताब्यात घेतली असेल, तर त्यांना सशस्त्र संघर्षाचा अधिकार आहे. कुठलीही ताकद हा अधिकार जबरदस्तीने हिसकावून घेऊ शकत नाही” “66 हजार शहीद पॅलेस्टिनींच्या मृतदेहांवर उभ राहून तथाकथित शांती प्रस्तावाच कौतुक करणं हे गुन्हेगारांना साथ देण्यासारख आहे” असं या युजरने पुढे लिहिलय.