Solar Eclipse | सूर्यग्रहणाची ‘या’ देशात इतकी क्रेझ का? 4 महिन्यांपासून तयारी सुरू; तब्बल इतक्या लाख कोटींचा बिझनेस

Solar Eclipse 2024 : भारतात सूर्यग्रहण मानला जातो अशुभ, पण या देशात तर सूर्यग्रहणामुळे 'अच्छे दिन...', देशातील लोकं गेल्या 4 महिन्यांपासून आहे सूर्यग्रहणाच्या प्रतीक्षेत..., होणार कोट्यवधी रुपयांचा फायदा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूर्यग्रहणाची चर्चा...

Solar Eclipse | सूर्यग्रहणाची 'या' देशात इतकी क्रेझ का? 4 महिन्यांपासून तयारी सुरू; तब्बल इतक्या लाख कोटींचा बिझनेस
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 10:21 AM

यंदाच्या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाची चर्चा संपूर्ण जगभरात सुरु आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. सांगायचं झालं तर, भारतात सूर्यग्रहण अशुभ मानला जातो, पण सातासमुद्रापार सूर्यग्रहण शुभ ठरला आहे. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा ज्या देशाला अधिक फायदा झाला आहे, तो देश दुसरा तिसरा कोणता नाही तर, अमेरिका आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सूर्यग्रहण अमेरिकेतील लोकांसाठी शुभ संयोग घेऊन आला आहे.

अमेरिकेतील कोट्यवधी लोकं 8 एप्रिलच्या प्रतीक्षेत होते. काही क्षणात आता चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकणार आहे. 4 तास 25 मिनिटं सूर्यग्रहण असणार आहे. यंदाच्या वर्षातील पहिला सूर्यग्रहण जवळपास 54 वर्षांनंतर होणार आहे, असं मानलं जात आहे. अमेरिकेतील लोकांमध्ये सध्या या खगोलीय घटनेचं क्रेझ पाहायला मिळत आहे.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी असंख्य लोकं अमेरिकेत जमा झाले आहेत. कारण इतकं लांब आणि स्पष्ट सूर्यग्रहण येत्या 20 वर्षात अमेरिकेत होणार नाही. त्यामुळे लोकांना या क्षणाचा अनुभव घ्यायचा आहे. यासाठी अमेरिकेत 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील 2 दिवसांत, अनेक विमाने अमेरिकेच्या 14 शहरांवर सतत उड्डाण करतील. ज्या शहरांमध्ये सूर्यग्रहण स्पष्ट दिसेल अशा शहरांमध्ये अमेरिकेतील इतर राज्यांतून लाखो लोक पोहोचत आहेत. ज्या शहरांमध्ये दिवसा जास्त काळ अंधार असतो अशा शहरांमध्ये लोकांनी हॉटेल्स बुक केली आहेत. अनेकांनी यासाठी काही महिन्यांपूर्वीच बुकिंग केलं आहे.

अमेरिकेतील हजारो लोकांनी विमानातून सूर्यग्रहण पाहाण्यासाठी बुकिंग केली आहे. आकाशातून ग्रहणाचं अद्भुत दृष्य पाहाण्यासाठी लोकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. अमेरिकेत असे हजारो लोक आहेत ज्यांना सूर्यग्रहण कुठे होणार हे चार महिने आधीच कळलं होतं. यासाठी त्यांनी आधीच विमान तिकीट बुक केलं आहे.

अमेरिकेतील कोणत्या शहरांमध्ये दिसणार सूर्यग्रहण?

अमेरिकेतील टेक्सास, ओक्लाहोमा, मिसूरी, इलिनॉय, इंडियाना, मिशिगन, आर्कान्सा, टेनेसी, केंटकी, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क, व्हरमाँट, न्यू हॅम्पशायर या शहरांमध्य सूर्यग्रहण दिसणार आहे. या शहरांमध्ये 4 मिनिटांमध्ये दिवसाची रात्र होणार आहे. सोमवारी जेव्हा सूर्यग्रहण दिसेल तेव्हा अमेरिकेतील लाखो लोकं या घटनेचे साक्षीदार असतील.

अमेरिकेत दुपारी 1.27 मिनिटं ते 4.35 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण दिसणार आहे. रिपोर्टनुसार, जवळपास 4 कोटी 40 लाख लोकं या घटनेचे साक्षीदार असणार आहेत. अशात विमानांच्या तिकिटांच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. 1500 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सूर्यग्रहणामुळे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हॉटेल्सच्या मागणीत 1200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये हॉटेलच्या एका दिवसाचं भाडं 120 डॉलर आहे. पण 8 एप्रिल रोजी हॉटेलच्या एका दिवसाचं भाडं 1585 डॉलर झालं आहे. एवढंच नाहीतर, ट्रांसपोर्ट कंपन्यांनी ग्रहण दिसणाऱ्या जागेवर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी स्पेशल पॅकेज जारी केले आहेत. ज्यामुळे अमेरिकेतील व्यवसाय एका दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

सूर्यग्रहणामुळे ‘या’ कंपन्यांचे अच्छे दिन

अनेक कंपन्या सोलर एक्लिप्स पार्टीचं आयोजन करत आहेत. विशेष सेटअप उभारून सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. क्लबमध्ये वैज्ञानिक आणि तज्ज्ञांसह सोलर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. जे क्लब प्रवेशासाठी 20 डॉलर आकारायचे ते आता 325 डॉलर आकारत आहेत.

आयएसओ प्रमाणित चष्म्यांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक वेबसाइट्सवर 3 डॉलरचे ग्लास 16 डॉलरला विकले जात आहेत. एकट्या टेक्सासमध्ये 1.4 बिलियन डॉलरचा व्यवसाय अपेक्षित आहे. व्हरमाँटमध्ये 230 दशलक्ष डॉलर पर्यंतचा व्यवसाय होऊ शकतो. सूर्यग्रहणामुळे अमेरिकेतील व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.