सोमवती अमावस्या – सूर्यग्रहण एकाच दिवशी, शुभ की अशुभ? भारतावर काय होतील परिणाम?
Solar Eclipse : सोमवती अमावस्या आज आहे आणि विशेष म्हणजे यंदाच्या वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण देखील आज आहे. त्यामुळे पहिलं सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. पण सोमवती अमावस्या - सूर्यग्रहण एकाच दिवशी आल्यामुळे त्याचे भारतावर काही परिणाम होतील का? याबद्दल जाणून घेऊ...

यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवतीच्या अमावस्येच्या दिवशी होणार आहे. सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे हा योग शुभ की अशुभ असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ज्योतीष विद्यामध्ये सूर्यग्रहण शुभ मानलं जात नाही. सूर्यग्रहण सूर होण्यापूर्वी सुतक काळ सुरु होतो. अशात अमावस्येवर याचा काही प्रभाव असेल का? जाणून घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. यंदाच्या वर्षातील पहिला सूर्यग्रहण जवळपास 54 वर्षांनंतर होणार आहे, असं मानलं जात आहे. तर सोमवती अमावस्या आणि सूग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे त्याचा भारतावर काही परिणाम होणार, सूतक काळ, ग्रहण वेळ आणि काही इतर गोष्टी देखील जाणून घेऊ…
कधी लागणार सूर्यग्रहण?
सूर्यग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री 9.12 मिनिटांनी होणार आहे. तर मध्यरात्री म्हणजे 9 एप्रिल 2024 रोजी पहाटे 02.22 वाजता सूर्यग्रण समाप्त होणार आहे. तब्बल 5 तास 25 मिनिटे हे ग्रहण असणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.
भारतावर काय होतील परिणाम?
सूर्यग्रहण मीन राशी आणि रेवती नक्षत्रात लागणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सूर्यग्रहण मान्य असणार नाही. सूर्यग्रहणाता परिणाम देखील सोमवती अमावस्येवर होणार नाही.. असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र ग्रहणाची चर्चा रंगली आहे.
कोणत्या देशांमध्ये दिसणार सूर्यग्रहण?
यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण अटलांटिक, पश्चिम युरोप पॅसिफिक, उत्तर अमेरिका, आर्क्टिक मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये, इंग्लंडत्या उत्तर पश्चिम भागात, आयर्लंड आणि कॅनडा या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे.
सूतक काळ
भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचा सूतक काळ मान्य होणार नाही. ज्या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे, त्या देशांमध्ये सूतक काळ लागू होईल. सूर्यग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 12 तासांपूर्वीच सुरु होतो. ग्रहण आणि सूतक काळात काही कामे करु नये अशी मान्यता गेल्या अनेक वर्षांपासून आहे…
पूर्ण सूर्यग्रहण म्हणजे काय?
पूर्ण सूर्यग्रहण लागल्यानंतर पृथ्वीच्या एका भागावर पूर्ण काळोख होतो. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत आल्यामुळे असं होतं. यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असल्यामुळे सर्वांच्या मनात ग्रहण पाहण्यासाठी उत्सुकता आहे. ग्रहण काळात काही ठिकणी शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.