श्रीलंकेत हाहा:कार, अख्खा देश अंधारात, अचानक वीज, पाणी, इंटरनेट ठप्प; काय घडलं?

श्रीलंकेत आज अचानक देशव्यापी वीज पुरवठा खंडित झाला, ज्यामुळे संपूर्ण देशात अंधार पसरला. पाणी पुरवठा आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली. एका तांत्रिक बिघाडामुळे हे संकट ओढवले असून, वीज पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ऊर्जा मंत्र्यांनी जनतेला पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कार्यरत आहे.

श्रीलंकेत हाहा:कार, अख्खा देश अंधारात, अचानक वीज, पाणी, इंटरनेट ठप्प; काय घडलं?
Sri Lanka Blackout
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 5:07 PM

श्रीलंकेसाठी आजचा दिवस अत्यंत भयानक ठरला आहे. अख्ख्या श्रीलंकेत आज वीज संकट निर्माण झालं आहे. आज दुपारी 12 वाजता अचानक संपूर्ण देशातील वीज पुरवठा ठप्प झाला. अधिकाऱ्यांच्या मते, तीन तासांपासून श्रीलंकेत अंधार बसरला आहे. बत्ती गुल झाल्यामुळे पाणी पुरवठा थांबला आहे. इंटरनेट सेवा आणि मोबाईल कनेक्टिव्हीटी ठप्प झाली आहे. त्यामुळे कर्मचारी कामाला लागले असून देशाच्या विविध भागात टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू झालं आहे.

शनिवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण देशात अंधार पसरला. यावेळी अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आमची टीम काम करत आहे, असं श्रीलंकेतील वीज पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Loading...

देशव्यापी वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही झाला आहे. त्यामुळे श्रीलेंकच्या पाणी पुरवठा विभागाने पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन केलं आहे. दीर्घकाळपर्यंत वीज पुरवठा खंडीत राहणार आहे. परिणामी पाणी पुरवठा होणार नाही. परिणामी पाण्याची समस्या निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाणी जपून वापरा, असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इंटरनेट सेवा आणि मोबाईल नेटवर्कवरही वीज संकटाचा परिणाम झाला आहे. मात्र, यातून मार्ग काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.

ऊर्जा मंत्र्यांनी काय सांगितलं?

देशातील वीज संकटावर श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री अनुरा करुणातिलका यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वीज व्यवस्थेत अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण देशातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र, देशव्यापी ब्लॅकआऊट नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही, असं करुणातिलका यांनी म्हटलंय. सरकारच्या मते, देशाच्या मध्य पर्वतीय क्षेत्रात एका जलविद्यूत संयत्रात बिघाड झाला. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असावी. तर, शुक्रवारी हायड्रोपॉवर प्लांटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळेच आज देशातील वीज पुरवठा खंडीत झाला असावा, असा अंदाज ऊर्जा मंत्र्याने वर्तवला आहे.

ग्रीडपासून दूर राहा

यावेळी ऊर्जा मंत्र्याने घराच्या छतावर सोलर पॅनल लावणाऱ्यांना विशेष अपील केली आहे. जेव्हा विद्यूत सिस्टिममध्ये बॅलन्स होत नाही आणि पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत रुफटॉप सोलर पॅनलला वीज ग्रीडपासून दूर ठेवा, असं आवाहन ऊर्जा मंत्र्याने केलं आहे. विद्यूत व्यवस्था सुरळीत सुरू करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us